पुणे/प्रतिनिधी ः राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधक यांची हिवाळी अधिवेशनात खडाजंगी बघतांना मिळून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेक

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधक यांची हिवाळी अधिवेशनात खडाजंगी बघतांना मिळून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतांनाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकासा आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जर, विधानसभेत फ्लोअर टेस्ट घेतली, तर आमच्याकडे 184 आमदार असतील असा खळबळजनक दावा बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाणारे ते आमदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपकडून करण्यात येत होते. त्यानंतर बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे.
सध्या शिंदे-फडणवीस सरकारकडे 164 आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे सांगत असलेले अधिकचे 20 आमदार कोण अशी चर्चा आता सुरु झाली आहे. फूट नको म्हणूनच विरोधकांची धावाधाव सुरु असल्याचा दावाची चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. विरोधक गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. काँगेस-राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे सगळे वेगळीकडे आहेत. विरोधकांकडे विषय नाही, त्यामुळे ते आव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जयंत पाटलांचे निलंबन नियमाला धरून झाले आहे. जर नसेल असे वाटत असेल तर विरोधकांनी कोर्टात जावे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायदेतज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी जे केले ते योग्य पद्धतीने झाले असेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. सरकार एका 32 वर्षांच्या तरुणाला घाबरले असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, सरकारमध्ये होते तेव्हा तुम्हाला कोणी घाबरत नव्हते. तेव्हा तुम्हाला न घाबरता तुमचे आमदार निघून गेले. लोकसभेमध्ये जो विषय मांडला गेला तोच विधानसभेत मांडला गेला. एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे, घाबरता कशाला? इतके काय कर्तृत्व आहे ज्यासाठी घाबरावे. उद्धव ठाकरे परिषदेत आलेच नाहीत. राजीनामा देणार म्हणाले होते दिला नाही. मग परिषदेत या चर्चा करा. एक दिवस आले पळून गेले. विरोधी पक्ष विषय मांडत नाही. उत्तर काय द्यायचे, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. बावनकुळे यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS