Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या’ 6 खासगी सावकारांची पोलिस करणार चौकशी ?

दै लोकमंथनमध्ये वृत्त प्रकाशित होताच पोलिस प्रशासनाने घेतली गांभीर्याने दखल

देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः  खासगी सावकारकीच्या जाचास कंटाळून राहुरी फॅक्टरी येथील सलून व्यावसायिक आप्पा विठ्ठल थोरात हे गेल्या चार दिवसांपासून बेप

सार्वजनिक बांधकाम विभाग नवनिर्मिती अणि सृजनशीलतेचे दुसरे नाव
विद्यार्थ्यांच्या पाठीशी आंबेडकरी जनता एकवटली
नगरच्या भ्रष्ट शिक्षण विभागावर कारवाई होईल का ?

देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः  खासगी सावकारकीच्या जाचास कंटाळून राहुरी फॅक्टरी येथील सलून व्यावसायिक आप्पा विठ्ठल थोरात हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंब चिंतेत असल्याचे दै लोकमंथनमध्ये वृत्त प्रकाशित होताच पोलीस प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेत थोरात कुटुंबियांची भेट घेऊन आप्पा थोरात घरातुन बेपत्ता होण्याबाबतची माहिती घेतली. त्यातुन  राहुरी फॅक्टरी व परिसरातील 6 सावकारांची नावे समोर आली आहेत. आप्पाला त्रास देणार्‍या ’त्या’ 6 खासगी सावकारांची पोलीस खरोखर चौकशी करणार का? जर पोलीसांनी खासगी सावकारांची चौकशी केल्यास खासगी सावकारांचे धाबे दणाणले जाणार आहे.

          सावकारकीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न असफल झाल्यानंतर आप्पा थोरात हे राहत्या घरातून बेपत्ता झाले आहे. चार दिवस उलटले तरी ते मिळून न आल्याने कुटुंबीय व नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहे. थोरात कुटुंबाला पोलीसांकडुन सहकार्य न मिळाल्याने निराश झालेल्या थोरात कुटुंबाने अन्नाचा त्याग केला होता.या बाबत दै.लोकमंथनमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पोलीसांनी थोरात कुटुंबाची भेट घेवुन खासगी सावकारकी बाबत चौकशी केली. राहुरी पोलीस ठाण्यात दाखल मिसिंगबाबत तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे व पोलीस प्रशासनाने सोशल मीडिया व इतर यंत्रणेत आप्पा थोरात यांचे छायाचित्र व वर्णनाची माहिती प्रसिद्ध करून सदर व्यक्ती मिळून आल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

               दरम्यान अंबिकानगर येथील रहिवासी असलेल्या बेपत्ता आप्पा थोरात याच्या कुटुंबियांची बुधवारी पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांनी भेट घेऊन चौकशी केली. या चौकशीत कुटुंबियांकडून राहुरी फॅक्टरी परिसरातील 6 सावकारांचे नावे समोर आली आहे. या सावकारांबाबतची सर्व माहिती थोरात कुटुंबियांनी पोलिसांना दिली असून यांच्यावर कठोर कारवाई करून आमचा ’आप्पा’ आम्हाला मिळून द्या आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.जोपर्यंत आप्पा सापडत नाही तो पर्यंत अन्नाचा एकहि कण घेणार नसल्याचे थोरात कुटुंबियांनी पोलीसांना सांगितले.

           दरम्यान पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आशवासन  दिल्याने थोरात कुटुंबीयांना दिलासा मिळाला. दुसरीकडे माञ खासगी सावकारांना माञ आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार या चिंतेने ’त्या’ सावकारांचे धाबे दणाणले आहे.

आमचे नाव घेऊ नका! आपण  मिटवुन घेऊ! –  आप्पा थोरात बेपत्ता झाल्यानंतर वारंवार तगादा करणार्‍या सावकारांची नावे पोलिसांसमोर आली असून त्यापैकी 6 सावकारांची नावे पोलिसांच्या रडारवर आहेत. अनेक सावकार आप्पा थोरात प्रकरणाचा ससेमिरा पाठीमागे लागू नये .म्हणुन राजकीय मध्यस्थीमार्फत थोरात कुटुंबियांची भेट घेत आहे. काय असेल ते मिटून घेऊ आम्हाला रुपया देऊ नका. पण या प्रकरणात आमची नावे घेऊ नका. अशी विनवणी थोरात कुटुंबाकडे करत असल्याचे थोरात कुटुंबाची भेट घेणार्‍या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले

COMMENTS