Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय वसतिगृहात बाल लैंगिक अत्याचाराबाबत समुपदेशन कार्यक्रम

सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या

तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कराड शहरातील वखारीला मध्यरात्री भीषण आग
जावळीच्या ओझरे शाळेला भारत सरकारचा स्वच्छ विद्यालयाचा दुसरा पुरस्कार जाहीर

सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये बाल लैंगिक अत्याचार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा 2012 (पोक्सो अ‍ॅक्ट) प्रशिक्षण आणि जनजागृती बाबत फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन संस्थेमार्फत समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन मुस्कान या संस्थेतर्फे शासकीय वसतिगृहातील प्रवेशितांना लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? त्याची शक्यता कोठे जास्त असते, अशा परिस्थितीमध्ये बालकांनी व पालकांनी कोणती विशेष काळजी घ्यावी. या कायद्यांतर्गत कोठे दाद मागता येते तसेच पोक्सो कायद्यातील तरतुदी, शिक्षा याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी गुड टच-बॅड टच याबाबत माहिती होण्यासाठी चित्रफित दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनात असणार्‍या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेसाठी मुस्कान संस्थेच्या प्रतिनिधी दिपाली दंडवते, धनश्री पाटील आणि श्रावस्ती साळवे यांनी मार्गदर्शन केले.

COMMENTS