लोणंद : उभारलेली टाकी उद्घाटनाच्या प्रतिक्षेत. (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे आजही पाण्याची गंभीर समस्या आहे. प
लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे आजही पाण्याची गंभीर समस्या आहे. पाणी ही निसर्गाची देण आहे. परंतू हे पाणी मिळविण्यासाठी लोणंदकरांना कायम वाट पाहावी लागत आहे. दिवसाआड पाणी सुटत आहे. काही प्रभागातून तर चार-चार दिवसाने पाणी येत आहे. पाण्याला तर वेळच नाही. पाणी कधी ही येऊ लागले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पाण्याची अशी बोंबाबोंब होत असली तरी पाण्याची चांगली व्यवस्था निर्माण करणे, मुबलक पाणी वेळेला उपलब्ध करून देणे गरजेचेच आहे. त्यातून अडचणी सोडविणे हे शासन म्हणून सत्तेत असलेल्या लोकांची आणि प्रशासन म्हणून अधिकारी वर्गाची जबाबदारी आहे. नुसते कागदपत्रावर सगळं ठीक असल्याचे दाखवयाचे आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. इथे पाण्याबाबत
व्यवस्थित लोणंदकर नागरिकांना पाणी पुरवठा होत नसताना हा पाण्याचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी का बरं प्रयत्न होत नाहीत.
लोणंदकर नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याचेच दाखविले जाते का? अडचणी सोडवून पाणी हे पाणी सुटण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी सुटायलाच हवे. पाणी उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आहे
महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या काययद्यानुसार कलम क्रमांक 50 व्या नुसार पाणी पुरवठा योजना तयार करणे व विवक्षित मुदतीत पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील, असे लिहिलेले आहे. तुम्ही खरच पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध करून देताय का? आज पाण्याची टाकी उभी असतानाही या पाण्याच्या टाकीला लवकर वापरात आणले जात नाही.
मानवनिर्मित अडचणीमुळे आज निसर्गनिर्मित पाणी मिळत नाही. हे पाणी या टाकीत पडणे आवश्यक आहे. गेली अनेक महिन्यापासून ही टाकी सुरू व्हावी म्हणून लोक प्रतिक्षेत असूनही या टाकीचा अजूनही उपयोग का केला जात नाही? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजतेतून सन 2019-20 अंतर्गत उंच जलकुंभ 7 लक्ष लिटर्स इतकी क्षमता असलेली टाकी उभारण्यात आली आहे. ही टाकी आपल्यासमोर उभी असताना आपण पाण्याच्या समस्येला सोडवत नाही. सगळं आपल्या जवळ आहे. परंतू त्याचा वापर का करता येईना झाला आहे. एकदा पाणी सुटले की पाणी पुन्हा सुटेपर्यंत लोकांना पाणी जपून वापरावे लागत आहे. लोणंद शहरातील लोकांना फिल्टर केलेल्या पाण्याचे जार विकत घेण्याची वेळ येत आहे. शुध्द पाण्याचा पुरवठा हा लोकांना होत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याबाबत लोणंद शहरातून तीव्र नाराजी पाहायला मिळत असते. लोणंद शहराला पाणी पुरवठा करणारी पाडेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्राचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरात चार दिवसाआड पाणी येत असल्याबाबतचे निवेदन ही पालकमंत्र्यांना भाजपकडून देण्यात आले आहे. त्या अडचणी सोडविण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. आज लोणंद शहरात लोणंदकरांच्या सेवेसाठी भली मोठी टाकी बांधली आहे. परंतू टाकीला अजून मुहूर्त लागेना. नक्की कुणासाठी या टाकीचे उद्घाटन लांबविले आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाण्याची टाकी बांधलेल्या स्वरूपात उभी असून ही त्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन अजूनही केले जात नसेल तर ही खूप शोकांतिका आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच गत लोणंदकरांची झाली आहे. पाणी तर भरपूर आहे परंतू पाण्याला त्या पाण्याच्या टाकीत पडून दिले तर नक्कीच पाण्याच्या समस्येला न्याय देता येणार आहे.
पालखी काळात टाकीचे उद्घाटन झाल्यास लाखो वारकर्यांची सेवा
पालखी काळात लाखो वारकरी लोणंद शहरात दाखल होत असतात. पायी चालत निघालेल्या या वारकर्यांना या पाण्याच्या टाकीतील पाणी
पिण्यास मिळाले तर एक चांगले काम केल्याचे समाधान मिळेल. पालखी सोहळा डोळ्यासमोर ठेवून तरी या पाण्याच्या टाकीचा शुभारंभ करण्यात यावा. टाकी सुरू करण्यास काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवाव्यात. उद्घाटनासाठी कुणाची वाट बघत बसला असाल तर हे अगदी चुकीचे असेल. पाण्याच्या टाकीचे उद्घाटन पालखी काळातच केल्याने लाखो वारकर्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा तर होईलच शिवाय लाखो वारकर्यांची सेवा या टाकीने करता येईल. लोणंदकर नागरिकांना वेळेत पाणी मिळत नाही. ही समस्या सुटण्यास ही मदत मिळेल.
COMMENTS