समतेचा करार केव्हा होणार ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

समतेचा करार केव्हा होणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी फ्रान्सला पोहोचले. पंतप्रधान मोदींचा हा पाचवा फ्रान्स दौरा. र

कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !
काँगे्रस आणि प्रादेशिक पक्ष
नव्या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी फ्रान्सला पोहोचले. पंतप्रधान मोदींचा हा पाचवा फ्रान्स दौरा. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पॅरिसमध्ये भारतीय समुदायाची भेट घेतली. फ्रान्स युरोपियन युनियनचे अध्यक्षपद भूषवत असताना मोदी पॅरिसमध्ये गेले. युक्रेन-रशिया युद्धामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आणि एकत्र काम करण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली. मात्र मोदी सरकार विदेशी दौरे करून विदेशी व्यापा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एकीकडे मोदींची भूमिका आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पार्टीचे किंबहुना विचाराचे लुंगे- सुंगे भारतात विदेशी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा प्रसार प्रचार करत आहेत. हे का आणि कशामुळे? यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. स्वदेशी जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघची आर्थिक संस्था आहे, जी स्वदेशी उद्योग आणि संस्कृतीच्या विकासासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करते. संघ परिवाराचा घटक म्हणून तिची ओळख आहे. ही राजकीय आणि सांस्कृतिक संस्था १९९१ मध्ये स्थापित झाली. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संलग्न असल्यामुळे आणि किमान २०१५ पासून स्वदेशी जागरण मंच थेट परकीय गुंतवणूकीवर टीका करत आहे. आता भाजप पक्ष संघाशी संलग्न आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मग नेमके धोरण काय? तर हे सारे उलट्या डोक्याचे जसे असते ‘तसेच’ म्हणावे का? कारण स्वदेशी जागरण मंच विदेशी वस्तूचा सर्रास वापर करून स्वदेशीचा नारा देतात. आणि अच्छे दिन लायेंगे म्हणून मोदी सत्तेत येतात. आता हे घडते कसे? तर इथेच सर्व गोंधळ आहे. भारतात १३० कोटी जनता जशी क्रिकेटमध्ये तज्ज्ञ आहे तशीच ती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात. वास्तव किंबहुना सत्यता याची तार्किक पद्धतीवर ते कधी तपासणीच करत नाहीत. मग अशा वेळी भोंगा काय आणि राममंदिर काय, हे जनतेला कळतच नाही. लोकांना अज्ञानी ठेवण्याचे सर्व कारनामे असले महाज्ञानी करतात. असो. भारत आणि फ्रान्समध्ये सक्रिय आणि बहुआयामी संबंध आहेत. प्रथम 1998 मध्ये दोन्ही देशांनी धोरणात्मक भागीदारी करार केला. उच्च राजकीय स्तरावरील नियमित संवाद, व्यापक संरक्षण सहकार्य आणि सक्रिय सांस्कृतिक संपर्क यांनी ही भागीदारी आणखी परिपक्व होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बहु-ध्रुवीय जागतिक व्यवस्थेवरील विचारांचे अभिसरण आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बहुपक्षीयतेची संकल्पना जागतिक स्तरावर दोन्ही देशांमध्ये सामंजस्यपूर्ण राजकीय समन्वय विकसित करण्यास मदत हेते. बदलत्या प्रादेशिक आणि जागतिक वातावरणात भारत आणि फ्रान्स आपले संबंध चांगल्या प्रकारे वाढवत आहेत. फ्रान्ससोबत भारताची आर्थिक भागीदारी महत्त्वाची आहे. तथापि, भारत-फ्रान्स संबंधांच्या आर्थिक क्षमतेचा अद्याप पूर्ण उपयोग झालेला नाही. 2016 मध्ये, दोन्ही देशांमधील एकूण व्यापार 858 दशलक्ष युरो इतका होता, जो २०१५ वर्षाच्या तुलनेत 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. 2017 मध्ये द्विपक्षीय व्यापाराने सकारात्मक चिन्हे दर्शविली. फ्रेंच कंपन्यांची भारतात लक्षणीय उपस्थिती आहे. भारतात सुमारे 1000 पेक्षा जास्त फ्रेंच कंपन्या कार्यरत आहेत. त्यांचा एकूण व्यवसाय 2000 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, ज्यामध्ये 3,00,000 लोकांना रोजगार मिळाला आहे. सुमारे 120 भारतीय कंपन्या फ्रान्समध्ये आहेत आणि त्यांची अंदाजे गुंतवणूक 100 दशलक्ष युरो आहे. भारतातील विदेशी गुंतवणूकदारांमध्ये फ्रान्स नवव्या क्रमांकावर आहे. एप्रिल 2000 ते मे 2016 दरम्यान भारतातील फ्रान्सची एकत्रित गुंतवणूक US$ 5150 दशलक्ष होती, जी एकूण थेट विदेशी गुंतवणुकीच्या (FDI) 1.5 टक्के आहे. सामर्थ्य आणि सहकार्याच्या दृष्टिकोनातून भारतीय आणि फ्रेंच अर्थव्यवस्थेकडे पाहता, भारत फ्रान्सला फारच कमी निर्यात करतो, जी फ्रान्सच्या एकूण आयातीपैकी केवळ 1.06 टक्के आहे. 2015 मध्ये सेवा क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार 341 करोड यूरो होता. पंतप्रधान मोदी यांच्या पाचव्या युरोप दौऱ्यात प्रगतीच्या वाटेवर भारत एक पाऊल नक्कीच पुढे टाकेल पण भारतातील प्रमुख समस्या आहेत तस्याच राहणार आहेत त्याचे काय? असे दौरे आणि करार अनेक होतील पण भारतात समतेचा करार केव्हा होणार?  

COMMENTS