राज्यसभेत गोंधळ ; तृणमूलच्या सहा खासदारांचे निलंबन

Homeताज्या बातम्याराजकारण

राज्यसभेत गोंधळ ; तृणमूलच्या सहा खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरूवातीपासूनच विरोधकांनी पेगॅसस आणि महागार्ईच्या मुद्यावरून आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे सरकारची कोंडी होतां

काँग्रेसचे ते दोन मंत्री कोण ? जे सत्ते शिवाय राहू शकत !!नाही | LOK News24
दिवंगत भास्कर मोकळे यांना अशोक हिंगे यांच्या वतीने अभिवादन
राहुरीमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरूवातीपासूनच विरोधकांनी पेगॅसस आणि महागार्ईच्या मुद्यावरून आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे सरकारची कोंडी होतांना दिसून येत आहे. बुधवारी पुन्हा एकदा राज्यसभेत विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. याप्रकरणी तृणमूलच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार वेलमध्ये उतरुन घोषणा देत होते. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.
पेगॅससच्या विरोधात सर्वच विरोधाी पक्षांनी आक्रमक पावित्रा स्वीकारला आहे. त्यामुळे तृणमुलच्या खासदारांनी देखील गोंधळ घातला. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात आले. अध्यक्षांनी या सदस्यांना आपापल्या ठिकाणी परत जाण्याचे आणि कार्यवाही पुढे जाऊ देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सभासदांसमोर आलेल्या आणि फलक दाखवणार्‍या सदस्यांची नावे नियम 255 अन्वये प्रकाशित केली जातील आणि त्यांना दिवसभर निलंबित केले जाईल. तरी देखील गोंधळ थांबला नाही. त्यानंतर अध्यक्षांनी गोंधळ निर्माण करणार्‍या सदस्यांना नियम 255 अंतर्गत सभागृह सोडण्यास सांगितले. राज्यसभेने दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार डोला सेन, नदिमुल हक, अर्पिता घोष, मौसम नूर, शांता छेत्री आणि अबीर रंजन बिस्वास यांना अव्यवहार्य वर्तनासाठी आजच्या सभागृहाच्या कामकाजामधून माघार घेण्यास सांगण्यात आले आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, 6 टीएमसी खासदारांच्या विरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

COMMENTS