Homeताज्या बातम्यासंपादकीय

नावात काय आहे ?

महान विख्यात नाटककार शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, ‘नावात काय आहे’? खरंतर आजकाल माणसांच्या नावांपेक्षा प्राण्यांना नावे ठेवण्यावरून मोठे वादंग हो

दिल्ली पोलिसांची दमनशाही
…तर, पुन्हा युद्धाचा भडका
राजकीय घडामोडींना वेग

महान विख्यात नाटककार शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, ‘नावात काय आहे’? खरंतर आजकाल माणसांच्या नावांपेक्षा प्राण्यांना नावे ठेवण्यावरून मोठे वादंग होतांना दिसून येत आहे. वाघिणीच्या बछड्याला सार्थक, आदित्य असे नावे ठेवण्याचे प्रकार वाढत आहे. आणि ती नावे सामान्य नावे आहे. काही माणसांना मांजरे आवडतात, ती त्या मांजरांची नावे लाडाने काय ठेवतील याचा नेम नाही. काहीजणांना कुत्र्याची पिल्ले खूप आवडतात. त्यांची नावे तर विचारू नये असेच असतात. कुत्र्यांच्या पिल्लांची नावे म्हणजे, तो त्या घरातील नातू आहे की नात आहे, असे वाटण्याइतपंत त्यांची नावे असतात. अर्थात त्या व्यक्तींकडून अशी नावे ठेवण्याचे कारण म्हणजे त्या प्राण्यांवर आपले किती प्रेम आहे, तो दर्शवण्याचाच तो एक भाग असतो. मात्र या नावांवरून काय घडेल सांगता येत नाही. कारण वाघाच्या बछड्याचे नाव ठेवण्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रताप घडला, आणि प्राण्याचें नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. शेक्सपिअर म्हटला आहे की, नावात काय आहे? मात्र आजच्या आधुनिक जगात नावाला अतिशय महत्व दिले जातांना दिसून येत आहे. नावाला आणि प्रतिष्ठेला जपण्यातच अनेकांकडून धन्यता मानण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर छ.संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या बछड्यांच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. बछड्यांच्या नावासाठी महानगरपालिकेने जनतेतून नावे मागविली होती, आणि त्या नावांच्या चिठ्ठ्यातून नावे काढून या बछड्यांची नावे ठेवण्यात येणार होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेल्या चिठ्ठीत आदित्य नाव निघाल्यानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या नावावर आक्षेप घेत, अजित पवारांना दुसरी चिठ्ठी काढण्यास भाग पाडले. आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार देखील मुनगंटीवारांचा आदेश डावलू शकले नाही. त्यांनी दुसरी चिठ्ठी काढून त्यात विक्रम हे नाव निघाले, आणि तेच नाव ठेवण्यात आले. सांगण्याचा उद्देश म्हणजे एका वाघाच्या बछड्याच्या नावाला आदित्य नाव ठेवण्यास नकार देण्यामागचे मुनगंटीवाराचे कारण काय ? खरंतर प्राणी संगहालयातील वाघांच्या बछड्यांचे नामकरण करण्याचा हा कार्यकम होता. शिवाय जनतेने नावे सुचवले होते. त्यामुळे जनादेश डावलण्याचे काहीही कारण नव्हते. शिवाय आदित्य नाव काही आपल्या संस्कृतीशी, धर्माशी न जुळणारे नव्हते. केवळ ते नाव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव असल्यमुळे जर मुनगंटीवार यांनी ते नाव टाळले असतील तर, मुनगंटीवार आदित्यला मोठे करतांना दिसून येत आहे. खरंतर एका वाघाच्या बिबट्याला आदित्य नाव दिल्याने डोंंगर कोसळणार नव्हता, किंवा त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीही मिळणार नव्हती. उलट मुनगंटीवार यांनी या नावाला विरोध केल्यामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे शेक्सपिअर या महान नाटककाराने नावात काय आहे ? असे म्हटले असले तरी, आजमितीस नावांचा प्रचंड डंका आहे. प्रत्येकाला आपले नाव झाले पाहिजे, असेच वाटते. त्या नावासाठी प्रत्येकजण कोणत्याही थराला जातांना दिसून येत आहे. राजकारणात जर नाव नसेल तर कुणी विचारत नाही, हा अनेकांचा अनुभव. त्यामुळे प्रसिद्धीलोलुपता मिळवण्यासाठी प्रत्येकजण हपापलेला असतो. याच संवंग लोकप्रियतेसाठी कोण काय करेल याचा नेम नसतांना, मुनगंटीवार यांनी आदित्य नावाला घेतलेला आक्षेप अनाकलनीय आहे. तसेच आदित्य नाव ठेवले असते, तरी ते नाव खूपच प्रसिद्ध झाले असते, राजकारणात कुणाला फायदा झाला असता, असेही काही नाही, तरी त्यांचा आक्षेप चर्चेचा विषय ठरतांना दिसून येत आहे. 

COMMENTS