Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; आमदार देसाई यांचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : शिवसेना नेमकी कोणाची यावरुन शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. हा वाद आत निवडणूक आयोगाच्या दारात पोहचल

दुचाकी-चारचाकी कारची समोरासमोर धडक; एकजण जागीच ठार
अन्यथा आणखी एका फाळणीस देशाला सामोरे जावे लागेल : माजी मंत्री अण्णा डांगे
पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या नैसर्गिक सौंदर्यात सेल्फी पॉइंटची भर; पर्यटकांची तुफान गर्दी

सातारा / प्रतिनिधी : शिवसेना नेमकी कोणाची यावरुन शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. हा वाद आत निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. 8 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी होणार आहे. असे असताना माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आ. शंभूराज देसाई यांनी उध्दव ठाकरे यांच्याविरोधात टीका केली.
उध्दव ठाकरे यांनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. अडीच वर्षात महाविकास आघाडीत आमची कोंडी झाली. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आदाराची भावना आहे. त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये. आम्ही शिवसेनेसाठी अनेक वर्षे काम केले. एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी उध्दव ठाकरे यांना कल्पना दिली होती. शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे वेळोवेळी सांगितले होते. पण, याकडे नेहमी दुर्लक्ष झाले.
सध्या शिवसेना पोखरण्याचे काम सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्याचे आम्ही काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय आणि युगपुरुष आहेत. बाळासाहेबांना एका कुटुंबापूर्ती मर्यादीत करू नका, असा सल्ला देत ते म्हणाले, बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा आहे, असेही देसाई यांनी ठामपणे सांगितले.

COMMENTS