Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकबाकीपोटी महावितरणच्या सबस्टेशनला मसूर ग्रामपंचायतीने सिल ठोकताच पाणी पुरवठा सुरळीत

कराच्या तडजोडी बाबतीत महावितरणची उदासीनता…..महावितरण आणि ग्रामपंचायत यांच्यात परस्पर असणार्‍या थकबाकीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाट

पाठीत खंजीर खुपसण्याचे शिवाजीराव नाईक यांचे काम : राहुल महाडीक
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती विक्रीस मनाई; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने मुर्तीकारागिर हतबल
सिल्व्हर ओकवरील हल्ला पूर्व नियोजित कट : ना. जयंत पाटील

कराच्या तडजोडी बाबतीत महावितरणची उदासीनता…..
महावितरण आणि ग्रामपंचायत यांच्यात परस्पर असणार्‍या थकबाकीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचे ठरले होते. परंतू महावितरणचे सहाय्यक अभियंता चेतन कुंभार यांच्याशिवाय बिलांची तडजोड करण्याचे अधिकार असणार्‍या सिव्हिलच्या अधिकार्‍यांनी उपस्थित राहण्यास जाणून बुजून टाळाटाळ केली होती. सहाय्यक अभियंता कुंभार यांना याबाबतचे अधिकार नसल्यामुळे हा प्रश्‍न निकाली निघाला नाही. जर त्यावेळी महावितरणचे अधिकारी उपस्थित राहिले असते तर ही वेळ आली नसती, अशी चर्चा यावेळी सुरू होती.

मसूर / वार्ताहर : येथील ग्रामपंचायतीचा 12 वर्षापासून लाखो रुपयांचा कर थकीत असून तसेच ग्रामपंचायतीने वारंवार चर्चेसाठी आमंत्रित करूनही चर्चेस टाळाटाळ करत महावितरणने दादागिरी करत ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा योजनेचे विज कनेक्शन बंद केल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी कर वसुलीसाठी महावितरणचे सबस्टेशनला सील ठोकले. या प्रकाराने महावितरणच्या अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली. ग्रामपंचायतीने जशास तसे नीती वापरल्याने महावितरणची कोंडी झाल्याने नाईलाजास्तव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे विज कनेक्शन पूर्ववत करून चर्चेसाठी तयार व्हावे लागले. मसूर ग्रामपंचायतीने महावितरणचे नाक दाबल्यावर तोंड उघडले, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.
याबाबत माहिती मिळालेली माहिती अशी की, सन 2012 पासून महावितरणने ग्रामपंचायतीचा कर भरलेला नाही. वारंवार चर्चेसाठी आमंत्रित करूनही महावितरणकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. महावितरणचे अधिकारी जाणून-बुजून बैठकीसाठी गैरहजर राहून थकित कराबाबत चर्चा करण्याचे टाळत होते. या विषयावर तोडगा निघत नसल्याने ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे विज बिल भरले नव्हते. त्यामुळे शुक्रवारी महावितरणने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे विज कनेक्शन बंद केले होते. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या मुजोरीला जशास तसे उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज दीक्षित, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे, प्रमोद चव्हाण, सतीश कदम, अक्षय कोरे व कर्मचार्‍यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता व त्या ठिकाणी असणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांची समक्ष महावितरणच्या सब स्टेशनला सील ठोकले. या घटनेचे गांभीर्य ओळखून महावितरणचे सहाय्यक अभियंता चेतन कुंभार यांनी पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर मसूर ग्रामपंचायतीने सबस्टेशनचे सिल काढले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सोमवारी संयुक्त सभा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने चालू वर्षीचे वीज बिल महावितरणला अदा करण्याचे ठरले आहे. त्याच वेळी महावितरणने चालू वर्षाची कराची रक्कम ग्रामपंचायतीला अदा करण्याचे ठरले आहे. यावेळी महावितरणकडून सामान्य नागरिकांनाही अनेक बाबतीत वेठीस धरले जात असल्याची चर्चा सुरू होती.

COMMENTS