Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईवर पाणीकपातीचे संकट कायम

1 मार्चपासून 10 टक्के कपातीची शक्यता

मुंबई : भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता मावळल्यामुळे मुंबई महापालिकेने पाणीकपातीचा प्रस्ताव तयार केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागावर पाणी टंचाईचे सावट
बंगळुरूमध्ये पाणीबाणीमुळे नागरिकांचे हाल
मुंबई, पुण्यावर पाणीकपातीचे संकट

मुंबई : भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता मावळल्यामुळे मुंबई महापालिकेने पाणीकपातीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे 1 मार्चपासून मुंबईभर 10 टक्के पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईची तहान भागवणार्‍या सातही धरणांत केवळ 45.43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कमी पाणीसाठा आहे. हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्याने भातसा आणि ऊर्ध्व वैतरणातील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र 10 दिवस उलटूनही सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पाणीकपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत मिळून सहा लाख 57 हजार 546 दशलक्ष लिटर म्हणजेच 45.43 टक्के पाणीसाठा आहे. धरणांतील साठा कमी झाल्यामुळे राखीव साठ्यातून पाणी मागण्याची वेळ महापालिकेवर मार्चमध्येच आली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पालिकेची राखीव साठ्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली होती. त्यामुळे पाणीकपात टळली होती. मात्र, पावसाने पुन्हा ओढ दिल्यामुळे जुलैमध्ये 10 टक्के कपात करावी लागली होती. पाणीसाठा 81 टक्के झाल्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये ती रद्द करण्यात आली होती.

COMMENTS