Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पदरावर महालक्ष्मीचा मुखवटा असणारी आकर्षक पैठणी   

नाशिक प्रतिनिधी - येवल्यातील पैठणी कारागीर आपली हस्तकाला विविध माध्यमातून पैठणीच्या पदावर साकारत असतो अशाच प्रकारे येवल्यातील पैठणी कारागिराने

माध्यान्ह भोजनात पाल आढळली
रशियाचे चांद्रयान ‘लूना-25’ कोसळले
शासकीय योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा – आमदार आशुतोष काळे

नाशिक प्रतिनिधी – येवल्यातील पैठणी कारागीर आपली हस्तकाला विविध माध्यमातून पैठणीच्या पदावर साकारत असतो अशाच प्रकारे येवल्यातील पैठणी कारागिराने महालक्ष्मीचा मुखवटा पैठणी साडीवर साकारला आहे. येवल्यातील पैठणी सर्वदूर प्रसिद्ध असून याच पैठणीवर येथील कलाकार विविध कला आपल्या माध्यमातून साकारत असतात. अशाच प्रकारे येवला शहरातील पैठणी कारागीर बंटीने आपल्या विशेष शैलीतून महालक्ष्मीचे मुखवटे पैठणीच्या पदरावर साकारले आहेत. याआधी देखील या कलाकाराने विविध प्रकारच्या कला या पैठणीवर साकारल्या आहेत. आतापर्यंत राजा रविवर्मा, विठ्ठल रुक्माई, शिवशंकर असे अशा विविध कला येथील पैठणी कारागीर आपल्या कलेच्या माध्यमातून हाताच्या साह्याने विणकाम करून पैठणीवर साकारत असतात. तसेच या कारागीराने आपली हस्तकला आजमावून ही विशेष पैठणी तयार केली. याकरिता या कारागीराला पंधरा दिवसाचा कालावधी लागला आहे. गणपती मध्ये मोठ्या प्रमाणात महालक्ष्मी घरोघरी विराजमान होत असतात अशी कल्पना या तरुणाच्या मनात आली व त्यांनी ती प्रत्यक्षात पैठणीच्या पदरावर साकारली. 

COMMENTS