Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साबला येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील मौजे साबला येथे महाराष्ट्र शासना च्या महिला व बालविकास विभागा अंतर्गत सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ग्र

वारीतील टेके पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य दिशादर्शक
सचिन वाझेवर बडतर्फीची कारवाई करणार
स्टील कंपनीत स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील मौजे साबला येथे महाराष्ट्र शासना च्या महिला व बालविकास विभागा अंतर्गत सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरावर   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  सन :2023 पुरस्कार वितरण सोहळा संपन्न . या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे या होत्या तर प्रमुख पाहुण्या उपसरपंच सौ . कचराबाई राजेंद्र सरवदे ,  सौ . सिंधूताई महादेव कटारे माजी सरपंच साबला , सौ . प्रतिभा पोपट काकडे , सौ . सुनंता अशोक काकडे आंगणवाडी शिक्षिका   , सौ . वर्षा सदाशिव काकडे आशा वर्कर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  पुरस्काराच्या मानकरी सौ . महानंदा प्रकाश नाईकनवरे व सौ . गंगा जालींदर मुळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . या पुररकार प्राप्त महिलांनी सामाजिक , धार्मिक ,  सांस्कृतिक , राजकीय , या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमासाठी गावातील महिलांनी सहभाग नोंदवला या मध्ये प्रथम सौ . अनिता रामराजे शिंदे , सौ . मंगल जालींदर काकडे , सौ . रविना विजयकुमार शिंदे , सौ . पुजा ज्ञानेश्वर पांचाळ , सौ . रूपाली हनुमंत परळकर , सौ . काशिबाई अभिमान राऊत , सौ . सारिका विजय सरवदे , सौ . कान्होपात्रा आण्णासाहेब मस्के , श्रीमती बिबिनंदा डोंगरे , सौ . कमल संदिपान सरवदे , सौ . मुक्ता अशोक पांचाळ , इत्यादी महिला उपस्थित होत्या तर पुरुषांनाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यामध्ये उमांशकर शिंदे , सदाशिव काकडे , अशोक काकडे , पोपट काकडे , ज्ञानेश्वर पांचाळ , लखन राऊत , राहूल मुळे , जालींदर मुळे , लखन कटारे इत्यादी पुरुष मंडळीही उपस्थित होते . तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी केले तर आभार लक्ष्मण काकडे यांनी मानले .

COMMENTS