Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोफत प्रवेशाच्या लॉटरीची प्रतिक्षा

लातूर प्रतिनिधी - आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी 25 टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी स्वंय अर्थसहित 200 शाळांची नोंदणी झाली आह

मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर
कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले
एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

लातूर प्रतिनिधी – आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी 25 टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी स्वंय अर्थसहित 200 शाळांची नोंदणी झाली आहे. या 200 शाळेतील 1 हजार 669 जागेवर 25 टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्हयातील 7 हजार 451 पालकांनी नोंदणी केली आहे. या पालकांचे आता मोफत प्रवेशाच्या विद्यार्थी निवडीच्या लॉटरी सोडतीकडे लक्ष लागले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे 25 टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी 200 स्वंय अर्थसहित शाळांसाठी ऑनलाईन नोंदणी झाली आहे. या 200 शाळेतील 1 हजार 669 जागेवर 25 टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी दि. 1 ते 17 मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले होते. मात्र सदर कालावधी अपूरा असल्याने पालकांच्या मागणीनुसार दि. 25 मार्च पर्यंत पालकांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत अहमदपूर, औसा, चाकूर, देवणी, जळकोट, लातूर तालुका, लातूर शहर-1, लातूर शहर 2, निलंगा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, व उदगीर तालुक्यातून 7 हजार 451 पालकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. या पालकांचे आता राज्यस्तरावरून विद्यार्थी निवडीसाठी निघणा-या ऑनलाईन लॉटरी सोडतीकडे लक्ष लागले आहे. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, दिव्यांग बालके,अनाथ बालके, एचआयव्ही प्रभावित बालके, कोव्हीड प्रभावित बालके, ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, अशा दुर्बल घटकातील अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी 25 टक्के (आरटीई) मोफत प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया स्वंय अर्थसहित, ज्या शाळांना अनुदान नाही अशा 200 शाळांची यावर्षी नोंदणी झाली होती. या शाळेतील 25 टक्के म्हणजे 1 हजार 669 जागेवर मोफत प्रवेश होणार आहेत.

COMMENTS