Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यातील 104 वर्षीय आजोबांची नायगावला भेट

लोणंद / वार्ताहर : नायगाव, ता. खंडाळा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमीत 3 जानेवारी रोजी जयंती उत्सव होत असताना लहानापासून ते थो

नाबार्डच्या माध्यमातून सोनगाव-कुमठे रस्त्याच्या पूलासाठी 7 कोटी 30 लाखांचा निधी
नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना लोकनेता म्हणत सन्मान
दहिवडीत चेक बाउन्स प्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास; प्रियदर्शनी पतसंस्थेला दोन लाखाची नुकसान भरपाई

लोणंद / वार्ताहर : नायगाव, ता. खंडाळा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमीत 3 जानेवारी रोजी जयंती उत्सव होत असताना लहानापासून ते थोरांपर्यंत अनेकांनी नायगावला भेटी देत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी एका विशेष प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची भेट विशेष कौतुकाची वाटली असून लोकांना ऊर्जा देणारी ठरली. यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव गेडाम हे 104 वर्षांचे वयोवृध्दांनी त्यांच्या मुलासह नायगावला भेट दिली. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव, जन्मघर व शिल्पसृष्टी पाहण्यासाठी त्यांनी नायगावला भेट देत फुले दांपत्यांना अभिवादन केले. या वयात आजोबांची ही जिद्द पाहून नायगावात आलेल्या सर्वच लोकांनी ही आजोबांच्या या जिद्दीने विशेष कौतुक करत सन्मान केला.
यावेळी 104 वर्षीय आजोबांचा नायगाव येथे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते व इतर उपस्थित होते. ज्या वयात आपले आरोग्य सांभाळायचे असते त्या वयात आजोबांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावाला भेट दिली. यवतमाळ जिल्ह्यातून आजोबांनी या वयात सातारा जिल्ह्यात येऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. खरोखरच आजच्या तरुणांनी यातून शिकण्यासारखे आहे. सावित्रीबाई फुले यांना नतमस्तक होण्यासाठी 104 वर्षाचे आजोबा जर आपल्या महापुरुषांचा वारसा जपण्यासाठी येत असतील महाराष्ट्रातील तरुणांनी ही या दिवशी आले पाहिजे. असे वैभव गीते यांनी म्हटले.
104 वर्षीय वसंतराव गेडाम हे 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले होते. विजय स्तंभाला अभिवादन करून त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ही भेट दिल्याने तसेच सर्वत्र कोरोनाजन्य परिस्थिती असतानाही या काळात आजोबांनी या दोन ठिकाणी भेट दिली. या वयात ही आजोबांनी भेटी दिल्याबद्दल लोकांकडून आजोबांच्या या धाडसाबद्दल विशेष कौतुक होते आहे.

COMMENTS