Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 733 नवीन रुग्ण

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात नव वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असल्याचे दिसून येवू लागले आहे. बुधवारी सकाळी जाहीर

प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई सुरू
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात नव वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असल्याचे दिसून येवू लागले आहे. बुधवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यात 733 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. दरम्यान, सातारा तालुक्यात 223 तर कराड तालुक्यात 106 रुग्ण सापडले आहेत. बाजारपेठा बंद होण्याच्या धास्तीने ग्रामीण भागात घबराट निर्माण झाली आहे.
नववर्षापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोग्य विभागासह विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कोरोना बाधितांचा आकडा असाच वाढत गेल्यास पुन्हा जिल्ह्यात सर्व बाजारपेठा बंद होण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र महागाईचा पारा वर चढत चालला असल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे सामान्य जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात सापडलेल्या कोरोना बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे : सातारा – 223, कराड – 106, पाटण- 35, महाबळेश्‍वर- 43, कोरेगाव- 41, जावली- 35, खटाव – 41, माण – 22, फलटण – 51, खंडाळा – 46, वाई – 68 व इतर – 22 असे एकूण 733 कोरोना बाधित रुग्ण सापडले.

COMMENTS