Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ह सेवेचे, प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ ः शिवाजीराव कपाळे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर शहर म्हणजे अनेकांच्या योगदानातून आकाराला आलेली आधुनिक नगरी होय, या नगरीच्या स्थापनेपासून डॉ.वा.ग. तथा बाबासाहेब

कुटुंबीयांना वाळीत टाकत केला तीन लाखांचा दंड
श्रीरामपुरात बिबट्याचा रंगला थरार, आठ जखमी; वन विभाग व पोलिसांनी केले जेरबंद
शिर्डीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर काँगे्रसचा मोर्चा

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर शहर म्हणजे अनेकांच्या योगदानातून आकाराला आलेली आधुनिक नगरी होय, या नगरीच्या स्थापनेपासून डॉ.वा.ग. तथा बाबासाहेब कल्याणकर यांचे वैद्यकीय सेवेत मोठे योगदान आहे, त्यांच्या कार्याची दखल घेणारे विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ह सेवेचे, समाजप्रबोधनाचे ज्ञानतीर्थ होय, असे विचार राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थापक, अध्यक्ष शिवाजीराव शन्कराप्पा कपाळे यांनी व्यक्त केले.
   येथील बोरावकेनगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे कर्मयोगी स्व.डॉ वा. ग. तथा बाबासाहेब कल्याणकर  व्याख्यानमालेचे द्वितीय व्याख्यान देताना शिवाजीराव कपाळे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये होते.प्रमुख उपस्थिती म्हणून माजी प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. प्रकाश मेहकरकर ह व्यासपीठावर विराजमान होते. डॉ. कल्याणकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते झाले.जावई डॉ. प्रकाश मेहकरकर, अड, सुभाष खुडे यांनी डॉ. कल्याणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवरांचा शाल, बुके, पुस्तके, गुच्छ देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवाजीराव कपाळे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येऊन त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.श्रीराम बोबडे यांनी मानपत्र वाचन केले.काशिनाथ गोराणे, डॉ. शिवाजी काळे, प्रा. शिवाजीराव बारगळ, चंद्रकांत कोकाटे, सुभाष वाघुंडे,आबा साळुंखे,श्रीराम बोबडे, सुभाष लिंगायत, प्रा. रमेश चौधरी,सुरेशराव बुरकुले आदिंचा सत्कार करण्यात आला.शिवाजीराव कपाळे यांनी पुढे सांगितले, डॉ.वामनराव कल्याणकर ह आदर्श डॉक्टर होते.त्यांचे जीवन पवित्र आणि प्रामाणिक होते. आता डॉक्टर व्यवसाय बदनाम होत आहे. कोविडच्या काळात रुग्णांची झालेली गोची आणि फसवणूक ही भयावह होती. काही डॉक्टर आदर्श आहेत पण ही संख्या वाढणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी  सुखदेव सुकळेसर  यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. प्रकाश मेहकरकर, काशिनाथ गोराणे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अध्यक्षीय भाषणातून विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे महत्व विशद करून स्व. डॉ. कल्याणकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. डॉ.कल्याणकर ह 1940 साली श्रीरामपूर येथे आले. श्रीरामपूर नगर परिषद ही 01 सप्टेंबर 1947रोजी स्थापन झाली,अशा कालखंडात चंद्रपूर जिल्ह्यातील उसगाव येथून आलेले डॉ. कल्याणकर ह श्रीरामपुराकरांशी एकरूप झाले. त्यांनी   समर्पित सेवेकार्याने  नावलौकिक मिळविला. त्यांची नावाची व्याख्यानमाला ही समाजप्रबोधनची ज्ञानज्योत आहे,तिचा विचारप्रकाश समाजाला सदैव लाभावा अशी अपेक्षा व्यक्त करून  कवितेतून मानवंदना दिली.कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे,साहेबराव सुकळे आदी उपस्थित होते. संजय बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, सुरेखा बुरकुले यांनी नियोजन केले तर उज्ज्वला बुरकुले यांनी आभार मानले.

COMMENTS