प्रयागराज महा कुंभमेळ्यात काल जी चेंगराचींगरी झाली; त्यामध्ये, अनेक सर्वसामान्य भाविकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. महा कुंभमेळाचे आयोजन मोठ्या
प्रयागराज महा कुंभमेळ्यात काल जी चेंगराचींगरी झाली; त्यामध्ये, अनेक सर्वसामान्य भाविकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. महा कुंभमेळाचे आयोजन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, त्यात किरकोळ दुर्घटना होऊ शकतात; परंतु, भव्य मोठ्या प्रमाणात आग लागणे, प्रचंड मोठी चेंगराचेंगरी होणे, या अतिशय गंभीर आणि दु:खद घटना आहेत. खरेतर, महा कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? असा प्रश्न जर केला तर, निश्चितपणे बोट प्रशासन आणि शासन यांच्याकडे जाते. काही तारखा हिंदू धर्म कॅलेंडर प्रमाणे पवित्र मानल्या जातात. त्या तारखांना महा कुंभमेळ्यात सर्वसामान्य भाविकांची अधिक गर्दी होऊ शकते; हे गृहीत असताना आणि तशी सूचना काढली असतानाही, अनेक व्हीआयपी गंगा स्नानासाठी प्रयागराज येथे दाखल झाले. परिणामी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, निमलष्करी दलांचा बंदोबस्त आणि व्हीआयपी चे अगदी थाटात गंगा स्नान घेणे, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर व्हीआयपी बनणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात जागा व्यापली गेल्याने, अगदी कमी जागेमध्ये करोडो भाविकांचे गंगा स्नानगृहीत धरण्यात आले. त्यामुळे, एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी उसळली आणि ही गर्दी पाहताना असं दिसतं की, भाविकांना पाय उचलायला देखील त्या ठिकाणी जागा नव्हती. यातून मार्ग काढताना भाविकांची रेटारेटी झाली. त्यातूनच ही चेंगराचींगरी इतकी भयाव अवस्थेत झाली. महिलांच्या अंगावरून, वृद्धांच्या अंगावरून अनेक जण पायी तुडवत चालताना दिसले. यामध्ये ३० ते ३५ बळी गेल्याचं स्वतः उत्तर प्रदेशच्या राज्य सरकार ने जाहीर केले. तरीही, प्रश्न उरतो की, यात सामान्यांचे बळी का गेले? असा जर प्रश्न आपण विचारला तर, त्याचे उत्तर शंकराचार्य अवधेशमुक्तानंद यांनीच दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, “हिंदू समाज व्यवस्थेत सर्वसामान्य आणि व्हीआयपी ही जी रचना त्या ठिकाणी करण्यात आली, हीच या ठिकाणी चेंगराचेंगरी आणि भाविकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे.” शंकराचार्यांनी मर्मावर ठेवलेलं बोट, हे आम्हाला देखील मान्य आहे. कारण, सर्वसामान्य जनता धर्माच्या बाबतीत सश्रद्ध असते. ती आपल्या प्रतिकांना आपल्या दैवतांना किंवा आपल्या पूजण्यासाठी किंवा त्या ठिकाणी संस्कृती समोर नतमस्तक होण्यासाठी भाविक म्हणून जेव्हा जाते, तेव्हा, सरकार नावाची गोष्ट जर त्यांना एक अतिशय सामान्य दर्जा देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतील, आणि चेंगराचींगरी मध्ये त्यांचे प्राण जात असतील तर, यापेक्षा वेगळं असं दुर्दैव काय असू शकेल? या सर्वसामान्य जनतेला चांगले दिन दाखवण्याच्या प्रतीक्षेत या देशामध्ये राजकीय सत्तेचा बदल झाला. परंतु, स्थिरावलेल्या या राजकीय सत्तेने या देशातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे का? त्यांचा स्वायत्त अधिकार नाकारला आहे का? नेमकं काय आहे? शासनाला याची जबाबदारी घ्यावी लागेल. महा कुंभमेळा हा हिंदू समाज बांधवांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा एक उत्सव असतो. या उत्सवात सामील होण्यासाठी देशभरातून लाखो करोडो भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्यांची अशी दुर्दशा करण्याची व्यवस्था जर त्या ठिकाणी करण्यात येत असेल तर, निश्चितपणे त्याला जबाबदार असलेलानाही याचा जाब विचारायला हवा. शंकराचार्यांनी हा सवाल विचारला आहे. त्यावर तिखट प्रतिक्रिया ही दिली आहे. साहजिकच त्यामुळे सर्वसामान्य हिंदू असणारा समाज हा निश्चितपणे विचार करायला लागला आहे. धर्माच्या अंतर्गत अशा प्रकारचं वर्गीकरण उभे करणे, हे आजपर्यंत देशात कोणत्याही सार्वजनिक व्यवस्थेत किंवा सरकारच्या काळात झालं नव्हतं. परंतु, हल्ली असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. या देशात संविधान ‘एक व्यक्ती एक मूल्य’ जोपासत असताना शंकराचार्यांनी देखील तोच प्रश्न विचारला की, भारतीय संविधान अशा प्रकारे व्हीआयपी आणि सर्वसामान्य असं वर्गीकरण करण्याची परवानगी देते का? तर स्वतः शंकराचार्य या संदर्भात उत्तर देतात की, भारतीय संविधान याला मान्यता देत नाही. त्यामुळे ‘एक व्यक्ती एक मूल्य’, पाळणाऱ्या किंवा तत्व असणाऱ्या संविधानाचही हे उल्लंघन आहे. त्यामुळे भारताच्या सर्वसामान्य जनतेला एक प्रकारे जी वागणूक इथली शासन संस्था देऊ पाहते आहे, ती निश्चितपणे समर्थनीय नाही.
COMMENTS