Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कल्याण शीळ रोड नागपूरच्या धर्तीवर डबल डेकर करणार – श्रीकांत शिंदे 

कल्याण प्रतिनिधी - वाढती लोकसंख्या पाहता येत्या काळात नागपूरच्या धर्तीवर  कल्याण शीळ रोड  डबल डेकर करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती ख

डायबिटीजवर टिप्स
जनशताब्दी एक्सप्रेसला भीषण आग
अकोल्यातील लक्ष्मी निवास गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीत सागर मैड विजयी

कल्याण प्रतिनिधी – वाढती लोकसंख्या पाहता येत्या काळात नागपूरच्या धर्तीवर  कल्याण शीळ रोड  डबल डेकर करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. याबाबत बोलताना  नागपूरला जसं डबल डेकर रस्ता केला आहे  म्हणजेच खाली रस्ता त्यावर फ्लायओव्हर  त्यावर मेट्रो केला आहे तसेच कल्याण शीळ रोड वर देखील करा अशी मागणी केली आहे .कल्याणची मेट्रोही तळोजापर्यंत जाणार आहे. ती जर या ब्रिज बरोबर एकत्र केली तर या ठिकाणी मेट्रोला ही पर्याय होईल त्याचबरोबर शिळफाटा ते रांजनोली पूर्ण रस्ता असेल ज्या ठिकाणी भविष्यात कल्याण डोंबिवलीकरांना ट्रॅफिकचे समस्यांमध्ये जावा लागणार नाही या दृष्टिकोनातून पुढचा वीस वर्षाचा विचार करून हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे. डोंबिवलीतील १२ रस्त्यांचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार  श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीत  पुढील पावसाळ्यापर्यंत जास्तीत जास्त रस्ते कोंक्रीटचे होतील..एम आय डी सी मध्ये एकाच प्रभागात १०० कोटींचे निधी दिलाय. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करतय .रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सहन देखील जाणार नाही असे सांगितले

COMMENTS