Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसमधून मुक्ती मिळाल्याने हलकं वाटतंय – संजय निरुपम

मुंबई : काँग्रेस नेतृत्वावर गंभीर टीका केल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निरुपम यांनी आपल्य

नोरा फतेहीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक | LokNews24
कुर्ल्यात तरुणीवर बलात्कार करून हत्या प्रकरण आरोपींना 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी | LOKNews24
शुध्दीकरणाची सांस्कृतिक मुर्खता !

मुंबई : काँग्रेस नेतृत्वावर गंभीर टीका केल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निरुपम यांनी आपल्या मनातली गोष्ट व्यक्त केली आहे. संजय निरुपम यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली हकालपट्टी नाही, तर स्वतःहून राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं. माजी खासदार असलेले संजय निरुपम हे बऱ्याच काळापासून काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. त्यात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी लोकसभेची उमेदवारी अमोल कीर्तिकर यांच्या गळ्यात टाकली. त्यानंतर निरुपमांची नाराजी प्रकर्षाने पुढे आली. काल पत्रकार परिषद घेऊन गांधी घराण्यावर थेट निशाणा साधत त्यांनी काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘काँग्रेस सिर्फ इतिहास में रह जायेगी’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. दरम्यान आज त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या ‘मन की बात’ जाहीर केली. पोस्टमध्ये ते म्हणतायत.. “कॉंग्रेस से मुक्ति मिलने के बाद आज मन बहुत हल्का लग रहा है। ऐसा लगता है सीने पर से एक बोझ उतर गया। पूरे कॉंग्रेस परिवार को धन्यवाद।” अर्थात “काँग्रेसमधून मुक्ती मिळाल्याने आज मन खूप हलकं झालं आहे, छातीवरचं ओझं उतरलं, असं वाटतंय. संपूर्ण काँग्रेस कुटुंबाचे आभार” असं निरुपम म्हणतात

COMMENTS