Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव काँगे्रसकडून कर्नाटकातील विजयाचा जल्लोष

कोपरगाव प्रतिनिधी ः कर्नाटक राज्यातील निवडणूकांत काँग्रेसची निर्विवाद एकहाती सत्ता आल्याने कोपरगाव येथे काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जनता दरबार ठरतोय चर्चेचा विषय…
वाघापूर सरपंचपदी रंजना बराते यांची निवड
सरपंच-उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे शासनाचे नोकर नाही

कोपरगाव प्रतिनिधी ः कर्नाटक राज्यातील निवडणूकांत काँग्रेसची निर्विवाद एकहाती सत्ता आल्याने कोपरगाव येथे काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नितीनराव शिंदे व पदाधिकारी यांचे कडून फटाक्यांनी जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले. भाजपला कंटाळून महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी विरोधात कर्नाटकच्या जनतेने काँग्रेस ला एकहाती सत्ता देत लोकशाहीला मानणारे राज्य असल्याचे सिद्ध केले आहे.
या विजयाचा जल्लोष कोपरगाव काँग्रेसने केला आहे. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाके फोडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला. तर शहरातील नागरिकांना पेढे वाटण्यात आले. त्यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील साळुंखे, किसान काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, चंद्रकांत बागुल, लक्ष्मण फुलकर, कैलास पंडोरे पैलवान, राजू पठाण, ज्ञानेश्‍वर भगत, चंद्रहार जगताप, महादेव नाना जगताप उपस्थित होते.

COMMENTS