Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन

जळगाव : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापल्यानंतर उन्मेष पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेत ठाकरे गटात बुधवारी

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू
द्वारकादास शामकुमारतर्फे पाणपोईचे उद्घाटन
पेठवडज जवळ खुले आम दारू विक्रीविरोधात  नागरिकांनी, दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर घातला घेराव  

जळगाव : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापल्यानंतर उन्मेष पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेत ठाकरे गटात बुधवारी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात त्यांचे स्वागत केले. उन्मेष पाटील हे जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. 2019 साली तब्बल 4 लाखांहून अधिक मताधिक्याने ते निवडून आले होते. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळं उन्मेष पाटील नाराज होते.
उमेदवारी नाकारल्यामुळे उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. कालच त्यांनी खासदार संजय राऊत व नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांचा पक्षप्रवेश निश्‍चित झाला आणि आज त्यांनी शिवबंधन बांधले.  उन्मेष पाटील आणि माझी व्यथा एकच आहे. उन्मेष पाटील यांनी भाजप वाढवण्यासाठी जसे कष्ट घेतले, तसेच कष्ट अनेक शिवसैनिकांनी घेतले. पण वापर करून फेकण्याची भाजपची नीती आहे. त्या नीतीला विरोध करण्याचे धाडस उन्मेष यांनी दाखवले. एका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात पुरात उडी मारली. सत्ता असते तिथे लोक जातात, पण उन्मेष पाटील हे जनतेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेसोबत आले आहेत. ज्यांनी आपली फसगत केली, त्यांना पुन्हा निवडून येऊ द्यायचे नाही. शिवछत्रपतींचा अस्सल भगवा आता जळगावातून लोकसभेवर पाठवायचा आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. कोणत्याही उमेदवारीसाठी किंवा पदाच्या लालसेपोटी मी शिवसेनेत आलेलो नाही. अवहेलनेला कंटाळलो होतो. भाजप-शिवसेनेच्या युतीत मी निवडून आलो होतो. मागील निवडणुकांमध्ये माझ्या विजयात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. एका भावाने दगा दिला असला तरी दुसर्‍या भावाने साथ दिली आहे. आता ही मशाल हाती घेतली आहे. क्रांतीची ही मशाल जळगावसह उत्तर महाराष्ट्रात नेऊ. क्रांतीचा विचार सर्वत्र रुजवू, असा शब्द उन्मेष पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला.

ठाकरे सेनेने चार ठिकाणी जाहीर केले उमेदवार
कल्याण लोकसभा मतदारसंघ – वैशाली दरेकर
पालघर लोकसभा मतदारसंघ – भारती कामडी
जळगाव – करण पवार
हातकंणगले – सत्यजित पाटील

उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाहीच – भाजपने जळगावमधून उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट ठाकरे गटात बुधवारी अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल असे संकेत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांना नेमके कोणते आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे, याचे उत्तर समोर आलेले नाही.

COMMENTS