Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्ण मंदिरात विविध उपक्रमाचे आयोजन

श्रीरामपूर ः येथील नेवासा रोडवरील श्रीकृष्ण मंदिर आणि महानुभाव मठात सोमवार 26 ऑगस्ट  रोजी सकाळी 10 वाजता कै.प.पू.महंत श्री ब्रीजलालदादा (आण्णा) प

आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून रेहेकुरी पर्यटनक्षेत्राचा वनपर्यटन आराखडा
आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला ः आरिफ शेख
हद्दपार असताना शहरात फिरणार्‍या एकास पकडले

श्रीरामपूर ः येथील नेवासा रोडवरील श्रीकृष्ण मंदिर आणि महानुभाव मठात सोमवार 26 ऑगस्ट  रोजी सकाळी 10 वाजता कै.प.पू.महंत श्री ब्रीजलालदादा (आण्णा) पंजाबी यांच्या स्मृतिप्रेरणेने कविसंमेलन, समाजप्रबोधन, मान्यवरांचा सन्मान सोहळा आणि ग्रंथसंवाद, परिसंवाद, धार्मिक उपक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंदिर प्रमुख महंत गोविंदराज दादा, महंत विशाल शास्त्री आणि साहित्यिक परिवारातर्फे देण्यात आली.
सोमवारी सकाळी 10 वाजता श्रीकृष्ण जन्म अष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जीवनावर आधारित कविता सादर होणार असून डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या साहित्यावर ग्रंथसंवाद, परिसंवाद होणार आहे. तसेच ह.भ.प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज प्रवचन, मुठेवाडगाव येथील  ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याप्रीत्यर्थ वसंतराव मुठे पाटील, डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा पुणे विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ठ झाल्याबद्दल तसेच मुख्याध्यापक भागवत मुठे यांच्या’ भागवत रहस्य’ ग्रंथ पुरस्कारबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. दिवसभर भजनी मंडळाचा कार्यक्रम, रात्री12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव असे विविध उपक्रम होणार आहेत. माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य किसनराव वमने, प्राचार्य काळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, पोपटराव आदिक, मुख्याध्यापक भागवत मुठे, सुखदेव सुकळेसर, लेविन भोसले, प्रा. शिवाजीराव बारगळ, संगीता फासाटे, डॉ. शिवाजी काळे, प्रा. विलासराव तुळे, पत्रकार बाळासाहेब तनपुरे, पत्रकार राजेंद्र देसाई, पत्रकार प्रकाश कुलथे, खरातसर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम होणार आहेत. कविसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्‍या कविंनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्याकडे नावे नोंदवावीत असे आवाहन  संयोजकातर्फे करण्यात आले.

COMMENTS