Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी

जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा, भडगांव तालुक्यातील अनेक गांवात आज  रात्रीच्या वेळी अचानक अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्य

बाजार समितीच्या निवडणूकीत तीन दिग्गजांचे अर्ज नामंजूर
रेणापूर बाजार समिती निवडणूक 51 उमेदवार रिंगणात
लातूरमध्ये होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती

जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा, भडगांव तालुक्यातील अनेक गांवात आज  रात्रीच्या वेळी अचानक अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व  भडगांव दोन्ही तालुक्यातील अनेक गांवात आज रात्रीच्या वेळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.त्यामुळे मात्र शेती पिकाचे नुकसान झाले आहे.पाचोरा तालुक्यातील बाळद , नगरदेवळा,वरखेडी,कुऱ्हाड, भडगांव तालुक्यातील कजगाव, भातखंडे,आदी दोन्ही तालुक्यातील परिसरात अवकाळी पावसाला सुरूवात झाली असुन या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे

COMMENTS