पंजाबमध्ये गोळीबार केला आणि शिर्डीत येऊन लपला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंजाबमध्ये गोळीबार केला आणि शिर्डीत येऊन लपला…

नगर पोलिसांनी केली 133 हॉटेलची तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी :पंजाब राज्यातील जालंधर येथे गोळीबार करून शिर्डीमधील हॉटेलमध्ये लपलेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. प

सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडावे : तहसीलदार पाटील
अकरा गावातील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची अनागोंदी थांबावी

अहमदनगर/प्रतिनिधी :पंजाब राज्यातील जालंधर येथे गोळीबार करून शिर्डीमधील हॉटेलमध्ये लपलेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी (वय 27, रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुनित सोनी हा जालंधर येथे गुन्हा करून पसार झाला होता.
हा आरोपी शिर्डी येथे असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी अहमदनगर पोलिसांना दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, सोमनाथ दिवटे, अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडगे, दत्ता हिंगडे, विजय वेठेकर, संदीप पवार, भीमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव व चालक पोलिस हेडकॉन्स्टेबल बबन बेरड व अर्जुन बड़े यांच्या पथकाने तांत्रिक तपास व शिर्डीतील तब्बल 133 हॉटेलची तपासणी करून आरोपी सोनीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गोळीबार केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. नगरच्या पोलिसांनी त्याला पंजाब पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. त्याच्याविरुध्द गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी सोनी याने जालंधर (पंजाब) येथे खुनाचा प्रयत्न करुन नंतर तो शिर्डी येथे लपला होता. तो सराईत आरोपी आहे. तो गुन्हा केल्यापासून आपले स्वतःचे अस्तित्व लपवून व वेळोवेळी राहण्याची ठिकाणे बदलून राहात होता. जालंधर व पंजाब पोलिसांनी प्रयत्न करुनही तो सापडत नव्हता. पंजाब येथील गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक इंद्रजीतसिंह यांनी मुंबईच्या पोलिस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन या फरार आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याची विनंत केल्याने महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना नगर जिल्ह्यात या फरार आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डीत शोध मोहीम राबवली. त्याच्या वर्णनानुसार त्याचा शोध घेत असताना नमूद वर्णनाचा एक संशयित शिर्डी येथील हॉटेलमध्ये राहतो, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक कटके यांनी दोन विशेष पथकांना सोबत घेवून शिर्डी परिसरातील 133 हॉटेलची तपासणी केली. या तपासणी दरम्यान हॉटेल निर्मल इन लॉजमध्ये एका संशयितला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव जसप्रितसिंग भुलाव (रा. जालंधर, पंजाब) असे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव पुनित उर्फ पिम्पु बलराज सोनी असे सांगितल्याने याच्याकडे जालंदरमधील गोळीबार गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईसाठी जालंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

COMMENTS