राहुरी/प्रतिनिधी ः लागोपाठ गारपीट, अवकाळी व वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला असून या आठवड्यात तीन

राहुरी/प्रतिनिधी ः लागोपाठ गारपीट, अवकाळी व वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला असून या आठवड्यात तीन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे 14 गावे बाधित झाले असून 700 हेक्टर होऊन अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे 1200 शेतकर्यांचे यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शासकीय स्तरावर व्यक्त करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यात यंदाच्या वर्षी सलग दोन वेळा वादळी, अवकाळी व गारपिटीने तालुका तालुक्यातील शेती व शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने गहू, कांदा, कपाशी, तूर, मका, हरभरा व अन्य चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील महिन्यात 7 मार्च च्या दरम्यान राहुरी तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे राहुरी तालुक्यातील 59 गावातील 3 हजार 400 शेतकर्यांचे 2 हजार 400 हेक्टर पीक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या यांनी प्राथमिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केली होते. यामध्ये दोन हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या चारशे शेतकर्यांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान ग्राह्य धरले होते, तर 33 टक्केपेक्षा जास्त अशा 350 हेक्टर क्षेत्र ग्राह्य धरले होते मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये राहुरी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. कपाशी, कांदा, सोयाबीन, मका या पिकांचा यात समावेश होता. राहुरी मंडळातील 6 हजार 291 शेतकर्यांचे सहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. राहुरी शहर तसेच काळे आखाडा, जोगेश्वरी आखाडा, दिग्रस, वाघाचा आखाडा आदी भागाचा यात समावेश असून या अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही शेतकर्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेले नाही. त्यातच पाचवीला पुजल्या सारखे अतिवृष्टी व अवकाळी पावसाने सातत्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. मागील आठवड्यात 7 ते 9 एप्रिल दरम्यान राहुरी शहरासह तालुक्यात 14 गावांमध्ये वादळी व अवकाळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे 698 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे शासकीय स्तरावरील प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 130 अशी बाधित शेतकर्यांची संख्या असून गहू, मका, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे यात म्हटले आहे. अजूनही कृषी विभाग महसूल विभागाच्या मदतीने पंचनामे सुरू असल्याची माहिती सांगण्यात येते.
COMMENTS