Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रंबकेश्वर ते पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्ग व्हावा 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे संत निवृत्तीनाथ संस्थांची मागणी

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी - संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज स्वतंत्र पायी दिंडी पालखी मार्ग म्हणुन त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर रस्ता स्वतंत्रपणे व

अज्ञातांनी दवाखान्यात वापरलेले साहित्य टाकले वस्तीजवळ, कोरोना पसरतोय वेगाने | LokNews24
अवैध वाळूचा डंपर उलटून एकाचा मृत्यू
बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज स्वतंत्र पायी दिंडी पालखी मार्ग म्हणुन त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर रस्ता स्वतंत्रपणे विकसीत व्हावा हि मागणी करणारे निवेदन केंद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री मा. नितिनजी गडकरी साहेब यांना अलिकडेच नाशिक भेटीत श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे व सचिव अड. सोमनाथ घोटेकर  यांनी संस्थानच्या वतीने दिले होते.  

केंद्रसरकारच्या वतीने देहू- आळंदी- पंढरपुर हा मार्ग संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणून विकसित होतो आहे .याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर पर्यंत संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांचा स्वतंत्र पायी पालखी मार्ग होणे अत्यावश्यक आहे.   पौष वारी यात्रेकरिता राज्यभरातुन लाखो वारकरी पायी त्र्यंबकेश्वर येथे येतात. त्याचप्रमाणे आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमीत्ताने त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला प्रस्थान होते. यातही लाखो वारकरी पायी सहभागी असतात.  त्यामुळेच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज स्वतंत्र पायी पालखी मार्ग व्हावा अशी मागणी वारकरी भावीक करत होते. वारकरी भाविकांची ही भावना ट्रस्टने केंद्रीय  मंत्र्यांपर्यंत पर्यंत पोहोचवली आहे.असे ट्रस्टचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी सांगितले.

खा. हेमंत गोडसे  साकडे. – वरील  विनंती मा.मंत्री गडकरी  यांना व नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांना करण्यात आलेली आहे.   या विषयावर सविस्तर चर्चा करुन पालखी मार्गाचा विषय मार्गी लावण्यासाठी आपल्यासह मा. नितिनजी गडकरी साहेबांची स्वतंत्र वेळ  मिळावी व आपण या कामात जातीने लक्ष घालावे असे निवेदन खासदार हेमंत गोडसे यांना संस्थांने दिले आहे.

COMMENTS