लातूर - विजांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी वीज कोसळल्याने जिल्ह्यात अकरा जनावरांसह एका मुलीचा मृत्यू झाला आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल

लातूर – विजांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी वीज कोसळल्याने जिल्ह्यात अकरा जनावरांसह एका मुलीचा मृत्यू झाला आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. अवकाळी पावसाने जिल्ह्यांत मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचे वातावरण असून विजांच्या कडकडांसह वादळी पाऊस झाला. जिल्ह्यातील निलंगा, उदगीर, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकुर, रेणापूर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय विविध ठिकाणी वीज कोसळून जिवीतहानी झाली आहे. निलंगा, जळकोट, उदगीरसह इतर काही तालुक्यातील शेत शिवारात गारांचा अक्षरश: सडा पडल्याने शिवराला काश्मीरचे स्वरूप आले होते. गारा आणि जोरदार वादळी पाऊस यामुळे दृश्यमानता कमी होऊन शिवार गारमय झाले होते. निलंगा तालुक्यातील मुबारकवाडी तंद्यवरील आरुषी ही ११ वर्षीय मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असताना विजांच्या कडकडाटांसह झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून मृत्यू पावली. तर हालसी तुगाव येथील मंदिरावर देखील वीज कोसळली. त्यामुळे मंदिराच्या भिंतीला तडे गेले असून फरश्या फुटल्या आहेत. हरी जवळगा येथील रतन गिरी यांच्या शेतातील शेतात बांधलेल्या तीन बैलांवर वीज कोसळून ते दगावल्याची घटना घडली. तूगाव हालसी येथील धुळप्पा बावगे यांच्या शेतातील बैलांवर विज पडून तो बैल दगावला. होसुर येथील शेतकरी बालाजी बिरादार यांच्या शेतातील बैल जोडीवर वीज उसळून ते दगावल्याची घटना घडली. उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी, येरोळ, डिगोळ येथे गारा पडल्या आहेत. त्यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे मोठमोठी झाडे उनमळून पडली. यामध्ये वाहनांचेही मोठे नुकसान झाले तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच विद्युत तारा तुटल्याने शहरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. तसेच तालुक्यातील हणमंतवडी येथे गोपाळ येलमटे यांची वीज कोसळून म्हैस दगावली.
COMMENTS