Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये आप स्वतंत्र लढणार ः केजरीवाल

नवी दिल्ली ः आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, अशा परिस्थितीत पंजाब राज्यातील लोकसभेच्य

केजरीवालांना १५ दिवसाची न्यायलीन कोठडी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स
अरविंद केजरीवाल यांची आज ईडी चौकशी

नवी दिल्ली ः आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, अशा परिस्थितीत पंजाब राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा आम आदमी पक्ष अर्थात आप स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा आप पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँगे्रस स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आपने देखील पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर काँग्रेस आणि आमच्यात एकमत झाले आहे, असे केजरीवाल म्हणाले आहेत. केजरीवाल यांनी रविवारी (18 फेब्रुवारी) काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या घरी जाऊन भोजन केले. त्यानंतर केजरीवाल यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. काँग्रेस आणि आपने पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले असून यावर आमचे एकमत झाले आहे, आमच्यात कोणतेही वैर नाही, असे केजरीवाल म्हणाले. काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. मात्र पंजाब राज्यात ते एकमेकांचे विरोधक आहेत. पंजाब राज्यात हे दोन्ही पक्ष स्वंतत्रपणे निवडणूक लढवणार असून दिल्लीसाठी आमच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दिल्लीमध्ये युती करण्यासाठी आमची काँग्रेसशी चर्चा चालू आहे. दिल्लीमध्ये आमच्यात युती न झाल्यास त्याचा भाजपाला फायदा होईल, असे केजरीवाल म्हणाले. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला होता. 2014 मध्येही त्यांनी सर्व जागा जिंकल्या होत्या. याआधी पंजाबचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते भगवंत मान यांनीदेखील आपने पंजबामधील सर्व 13 जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे, असे सांगितले होते.

COMMENTS