Homeताज्या बातम्यादेश

लिफ्ट कोसळून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

लखनौ/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेशमध्ये लिफ्ट कोसळून चार कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ठ

आष्टी तालुक्यातील केळ सांगवी येथील ड्रॅगन फ्रूट,खजूर,सफरचंद बागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी
पुण्यातील 3 पोलिसांनी 45 लाख लुटलं | DAINIK LOKMNTHAN
एमडी ची नशा आणि नाशिक ची दुर्दशा 

लखनौ/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेशमध्ये लिफ्ट कोसळून चार कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांनाच, उत्तर प्रदेशमध्ये लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. शहरात बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधल्या जात असलेल्या आम्रपाली ड्रीम व्हॅलीत ही दुर्घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चार मजूर हे बिहारमधील विभूतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील किशनपूर ताभका गावातील एकाच परिसरातील रहिवासी होते. एका पुतळ्याजवळ ही इमारत बांधली जात होती. यावेळी लिफ्ट मोठ्या उंचीवरून खाली पडली. अचानक लिफ्ट तुटली आणि लिफ्ट खाली गेली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या घटनेत ठार झालेल्या कामगारांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

COMMENTS