Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाभळगावात मोहर्रम सण उत्साहात साजरा

बाभळगाव प्रतिनिधी - लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील सर्वधर्मीय प्रसिध्द असलेला मोहर्रम प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला.

मुंबई शहरातील पूर्व-पश्‍चिम दू्रतगती महामार्गावरील कामात अपहार
आतापर्यंत दहा हजार वाहनांची तपासणी
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमीष दाखवून तरुणीची फसवणूक

बाभळगाव प्रतिनिधी – लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील सर्वधर्मीय प्रसिध्द असलेला मोहर्रम प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील मानाचा डोला लोकनेते विलासराव देशमुख यांचा थोरला (थोरला डोला) आहे. हा सण शनिवारी दि. 30 जुलै रोजी साजरा करण्यात आला.
गावात सुरवातीला मानाप्रमाणे उद घेत मलंगशाहवली दर्गाह येथील सवारी यांची इस्माईल फकीर, मकबुल सय्यद यांची सवारी, नबाब सय्यद यांचा रमता ताजिया (डोला), इमाम मुजावर पाशा मुजावर दिलदार शेख यांचा मधवा (डोला), मोहय्योददीन शेख यांचा धाकटा (डोला), भास्कर बोयणे यांचा ताजिया(डोला ), सिकंदर सय्यद यांचा चिग्गी ताजिया (डोला) गावात वाजत गाजत मंदीर, दर्गाह तसेच लोकनेते विलासराव देशमुख यांच्या गढीवर उद घेत मिरवणूक जुलूस काढण्यात आला. यावेळी सरपंच प्रतिनिधी सचिन मस्के, दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शाम देशमुख, पोलिस पाटील मुक्ताराम पिटले, उपसरपंच गोविंंद देशमुख, सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी जाधव, पत्रकार कलिम पठाण, ग्रा.प. सदस्य कैलास मस्के, पोपट अवघडे, लालासाहेब मुळे, प्रताप माने, बाबासाहेब देशमुख, नवनाथ मस्के, नवाब सय्यद, दिलदार शेख, मकबुल सय्यद, रफीक शेख, बाळू स्वामी, जलील शेख, पिटू मुळे, वैजनाथ देशमुख, जोतिबा तोडकर, व्यंकट देशमुख, रसुल शेख अजहर शेख, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी सगर, अंगद देशमुख, सुभाष पिटले, गुलाब फकीर, रफिक फकीर, इस्माईल सय्यद,लतिफ फकिर, कासिम सय्यद, शुकूर सय्यद, अहमद पठाण, जीनुद्दीन शेख, फत्तू शेख, जिलख शेख. बीट अमलदार महादु मस्के, हालकी वादक अंगद मस्के, दत्ता मस्के, सतीष मस्के, ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी मस्के आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS