Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंहगडावर सापडले प्राचीन पटखेळांचे अवशेष

पुणे प्रतिनिधी - पुण्यातील सिंहगड या किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी श्री. सचिन पाटील (पुरातत्वज्ञ) यांना देवटाके परिसरात काही खेळांचे अवशेष साप

पाच राज्यात रणधुमाळी सुरू
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
मारुती महाराज कारखान्याने दिला 2555 रुपये भाव

पुणे प्रतिनिधी – पुण्यातील सिंहगड या किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी श्री. सचिन पाटील (पुरातत्वज्ञ) यांना देवटाके परिसरात काही खेळांचे अवशेष सापडले होते त्यानुसार नाशिकच्या सोज्वळ साळी (पुरातत्वज्ञ व प्राचीन खेळ संशोधक) व अभिषेक गजर यांना २ मंकला नावाचे खेळ शोधण्यात यश आले आहे. 

फेब्रुवारी २०२२ रोजी पुण्यातील हिंजवडी जवळील मारुंजी या टेकडीवर ४१ खेळांचे पट शोधण्यात यश आले होते. त्यानंतर कापुरहोळ येथे ३५, भोरदरी येथे १७, वैष्णवधाम येथे ३७, तुळजा लेणी येथे २८ असे महाराष्ट्रात ९०० पेक्षा जास्त खेळांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या “ प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेंतर्गत” सुरु असून प्राचीन व्यापारी मार्गांवर व्यापारी, प्रवासी, पर्यटक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रवास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

सिंहगड हा किल्ला शिवकाळातील किल्ल्यांपैकी एक असून सातवाहन काळात या डोंगराचा वापर होत असावा. कारण या किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाके आहेत. जे शिवकाळापेक्षा जुने आहे. याच किल्ल्यावर देवटाके जवळील एका खडकावर अफ्रिकेतील पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जाणारा मंकाला जो दक्षिण भारतात पलंगुळी म्हणून सुद्धा ओळखला जातो. 

सिंहगडावर सापडलेल्या मंकालाला इरिट्रिया(वेस्ट) देशात अंदाद, मोझांबिक आणि दक्षिण आफ्रिका देशात कुबा व मेफुव्हा या नावाने तर मलावी देशात स्प्रेटा व सुट या नावाने तसेच झिम्बावे या देशात त्सोरो या नावाने ओळखले जाते. हे खेळ संवर्धन होणे गरजेचे असून हे खेळ शिकल्यास मोबाईलमधील खेळापासून मुक्ती मिळू शकते असे मत सोज्वळ साळी यांनी व्यक्त केले.

COMMENTS