… न परवडणारे पेट्रोल

Homeताज्या बातम्यासंपादकीय

… न परवडणारे पेट्रोल

मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल यांच्या किमतीमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी सातत्याने घसरण तसेच र

एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह
सुटकेची आशा
अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख

मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल यांच्या किमतीमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी सातत्याने घसरण तसेच रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमतीमध्ये होत असलेली वाढ, हे पेट्रोल व डिझेल यांच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. डिझेलचे दर वाढल्यावर वाहतुकीचा खर्च वाढतो व एकूणच सर्व वस्तुंच्या किंमती त्यामुळे वाढतात. ही मोठी किंवा छोटी वाढ सामान्य लोकांना परवडणारी अजिबात नाही. यामुळे सामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडून वाढत्या खर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड जाते. परंतु मोदीविरुद्ध बोलण्या पलीकडे  जनता काहीही करू शकत नाहीत, हे वास्तव आहे. मुळात पेट्रोलजन्य पदार्थांच्या किंमती का वाढतात? ही वाढ कधी थांबणार? ती थांबणार आहे की नाही? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला आताशा भेडसावू लागले आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की, रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. सध्या अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल १२०.७३ रुपये तर डिझेल १०३.४२ लिटर या किमतीने मिळते. यात दिवसोंदिवस वाढ होत आहे. देशात गेल्या दोन महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. एक दिवसाच्या स्थिरतेनंतर पुन्हा- पुन्हा इंधनदरात वाढ होत आहे. मागच्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ८३ पैशांची वाढकेली होती. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ११२.५१ रुपयावर गेले. तर, डिझेल ९६. ७० रुपये प्रतिलीटर आहे. यात पुन्हा वाढ झालेल आणि होत आहे. मागच्या आठवड्यात दिल्लीत पेट्रोल९७.८१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०३.६७ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०७.१८ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८५ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १०३.११ रुपये झाले आहे. भारत लागणाऱ्या आपल्या रोजच्या गरजेच्या ८० टक्के इंधन परदेशातून आपण आयात करतो. करोनाच्या काळात मात्र किमती घसरल्यानंतर जगभरात नोव्हेंबर २०२० पासून तेल आणि गॅसच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २२ मार्च रोजी ५० रुपयांच्या वाढीनंतर भारतात १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत नोव्हेंबर २०२० पासून ६० टक्क्यांनी वाढली. जगातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रित करण्यात सौदी अरेबियाचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबर २०२० पासून सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोने गॅसची किंमत ३७६ मेट्रिक टनांवरून ७६९ मेट्रिक टनांपर्यंत वाढवली. या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४१ अमेरिकन डॉलरवरून ११५.४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तेल आणि गॅसच्या किमती फार काळ नियंत्रणात ठेवणे भारतासारख्या देशाला शक्य नाही. अमेरिका आणि सौदी अरेबियानंतर रशिया हा जगामधला तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु असल्याने निर्यात केलेल्या कच्च्या तेलापैकी ६५ टक्के तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येत नाही. त्यामुळे जगात तेलाचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे कच्च्या तेल आणि गॅसच्या किमती झपाट्याने दररोज वाढत आहेत. २४ फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत ७ मार्च रोजी प्रति बॅरल ९० डॉलरवरून वाढून १४० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या  होत्या. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल प्रति बॅरल ११५ डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे भारतात दिवसोंदिवस पेट्रोल महाग होत आहे. हे पेट्रोल सामान्यांना न परवडणारे पेट्रोल.

COMMENTS