Homeताज्या बातम्यासंपादकीय

डपफेक व्हिडीओचे तंत्रज्ञान घातकच

तंत्रज्ञानाचे आपण अनेकवेळेला तोंड भरून कौतुक करत असतो. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले. तंत्रज्ञानामुळे मानवाचे श्रम वाचले. तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैश

विकासाचे राजकारण…
विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राची भरारी
नोटबंदीची वैधता आणि परिणाम

तंत्रज्ञानाचे आपण अनेकवेळेला तोंड भरून कौतुक करत असतो. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले. तंत्रज्ञानामुळे मानवाचे श्रम वाचले. तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैशाचीही बचत झाली. इथपासून ते तंत्रज्ञानाने विकासाचे नवे युग साकार झाले. इथपर्यंत त्याचे गोडवे गायले जातात. माहिती तंत्रज्ञानाने निश्‍चितच एक युग साकार झाले. प्रत्येकाच्या हातातील मोबाईल अनेकांसाठी जीव की प्राण बनला आहे. अनेकांसाठी तो प्राणवायू किंवा ऑक्सिजन ठरू लागला आहे. जसजसा तंत्रज्ञानाचा डायनॉसोर आकाराने मोठा होत गेला. विनाशास हेच तंत्रज्ञान मुळ कारण होवू लागले आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा धोका सगळ्या जगाला कसा भेडसावणार असल्याचे अंदाज तज्ज्ञांनी विश्‍लेषण केले होते. कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर नियंत्रणात राहिला तर जगभरातील मानवजात सुरक्षित राहिल.

सन 2016 पासूनच या तंत्रज्ञानाचा वापर पाश्‍चात्य देशांमध्ये सुरु झाला होता. परंतू आता त्याला कृत्रिम बुध्दीमत्तेची जोड मिळाल्याने हा डिपफेक प्रकार खरे काय आणि खोटे काय यातला भेदच नाहीसा करणारा ठरत आहे. प्रामुख्याने सोशल मीडियावर टाकले जाणारे व्हिडीओ इतक्या बेमालूमपणे बदलले जातात की, ज्यात खरा व्हिडीओ कोणता हे ओळखणे शक्य होत नाही. किंबहुना खर्‍याला खोटे ठरवून नव्याने तयार केलेला खोटेपणा खरा असल्याचे या प्रकारात बिंबवले जाते. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात जाहीरपणे चिंता व्यक्त केली होती. हा प्रकार तातडीने रोखण्याची गरजही बोलून दाखवली. डिपफेक या नावातच त्याचा खोटारडेपणा लक्षात येतो. हा प्रकार नेमका कसा आहे असा जेव्हा प्रश्‍न उपस्थित होतो. तेंव्हा तो इतक्या वेगवेगळ्या पध्दतीने समोर येतो की, खरेपणाचा किंवा सत्याचा विषयांस नव्हे तर सत्यानाश करणारा गंभीर प्रकार वाटू लागतो. एखाद्दा व्हिडिओमध्ये तुमच्या तोंडी नको ती वाक्ये घालण्यापासून किंवा एखाद्यात व्हिडिओत जबरदस्ती घुसवण्याचे कोणतेही प्रकार केले जाऊ शकतात. खरी परिस्थिती किंवा वस्तुस्थितीला हद्दपार करून बेमालूमपणे तयार केलेले खोटे व्हिडीओ हेच अंतिम सत्य असल्याचे भासवले जाते. म्हणजे ज्या सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक प्रमाणात होतो. त्यातल्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा डिपफेक प्रकार वाटेल तसा धुमाकूळ घालू शकतो. मग देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्कर प्रमुख, न्यायाधीश अशा अत्यंत महत्वाच्या पदावर असणार्‍या व्यक्तींच्या तोंडी खोटी चुकीची किंवा भडकवणारी भाषा वापरून अशांतता निर्माण केली जाऊ शकते. आणि हे कोणत्याही क्षेत्राबाबत घडू शकते.

शिक्षण, आरोग्य, संरक्षण, राजकारण, कला, मनोरंजन आदी केवळ तंत्राचा वापर करून यंत्रणा बिघडवण्याचे कौशल्य या डिपफेक प्रकारात वापरले जाते. अगदी अमेरिकेनेही गेल्या काही महिन्यांपूर्वी तिथल्या प्रमुख कंपन्यांशी संपर्क साधून या धोक्याला आवर घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. बनावटगिरी करून तयार झालेले व्हिडीओ ओळखण्याची व्यवस्था कंपन्यांच्या प्लँटफॉर्मवरून होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत बोगस बनावट आणि समाज, देश आणि एकूण सुरक्षिततेला बाधा आणणारे कोणतेही व्हिडीओ प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. ज्यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले सगळे प्रतिष्ठित देश खडखडून जागे झाले आहेत. याचा अर्थ त्यांच्या सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय किंबहुना त्यांच्या संवैधानिक रचनेलाच मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाने वेळीच जागे होणे महत्वाचे आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चुकीच्या पध्दतीने व्हिडीओ आणि रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्यासुध्दा शक्य करून दाखवण्याचा प्रकार केला गेला. आज सामाजिक किंवा राजकीय टीकेसाठी किंवा टिंगल-टवाळीसाठी त्याचा उपयोग होत असला तरी समाजाच्या भावना भडकवण्यासाठी त्याचा केव्हाही वापर होऊ शकतो. सोशल मीडियाचा समाजावर प्रभाव आहे. मुळातच चार ते पाच मिनिटाचे हे व्हिडीओ असतात. परंतू एकाचवेळी कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचत असल्याने त्यातून अशांतता निर्माण करणारे सहज शक्य होते.

COMMENTS