Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर नागपूरचा कलंक अशी खोचक टीका केली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फड

तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, कळणार नाही
भाजपकडून या 99 उमेदवारांना संधी
वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर नागपूरचा कलंक अशी खोचक टीका केली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ठाकरेंवर अत्यंत तिखट शब्दांत पलटवार करत म्हटले की, माझे माजी मित्र उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. त्यांची स्थिती आपण समजून घेतली पाहिजे, अशी जहरी टीका केली.
फडणवीस पुढे म्हणाले की, आमचे आजचे विरोधक व माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याचा राजकारणाच फारच विपरित परिणाम झाला आहे. कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल की काय? अशी स्थिती आहे. या मानसिक स्थितीतून ते बोलत असतील, तर त्याच्यावर फार काही बोलणे योग्य ठरणार नाही. त्यांची स्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजे. माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख कलंकीचा काविळ म्हणून केला होता. यामध्ये फडणवीस म्हणाले की, ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक,  आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक, सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक,  सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक,  ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक,  पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक, कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक,  लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक, असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी अशा तिखट शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे

COMMENTS