Homeताज्या बातम्याविदेश

माउंट एव्हरेस्टजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता

काठमांडू/वृत्तसंस्था : नेपाळमध्ये मनांग एअरचे हेलिकॉप्टर माउंट एव्हरेस्टनजीक बेपत्ता झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. त्यातील पाच जण विद

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा : अजित पवार यांचे निर्देश
चिंताजनक वित्तीय तूट !
भिंगाणगाव चार दिवसांपासून अंधारात

काठमांडू/वृत्तसंस्था : नेपाळमध्ये मनांग एअरचे हेलिकॉप्टर माउंट एव्हरेस्टनजीक बेपत्ता झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. त्यातील पाच जण विदेशी होते. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं की, 9 एन-एएमव्ही हेलिकॉप्टरने उड्डाण भरल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत संपर्क तुटला. या हेलिकॉप्टरने सकाळी पावणेदहाच्या सुमारास सोलुखुंबूमधील सुरकी येथून राजधानी काठमांडूसाठी उड्डाण भरले होते. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या माहिती अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिले आहे.  हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि इतर पाच जण होते. नेपाळच्या नागरी उड्डाण मंत्रालयानंही ट्विट करून माहिती दिली आहे. हेलिकॉप्टरमधून सहा जण प्रवास करत होते. त्यातील पाच नागरिक हे विदेशी होते. तर एक कॅप्टन होता. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरच्या शोधासाठी आणि बचावकार्यासाठी एल्टिट्युड एअर हेलिकॉप्टर काठमांडूहून पाचारण करण्यात आले आहे. यावर्षी जानेवारीत नेपाळमध्ये एक विमान कोसळले होते. यात सर्वात मोठी जीवितहानी झाली होती. या भीषण अपघातात 70 जण ठार झाले होते. येति एअरलाइन्सचे हे विमान काठमांडूहून पोखराकडे जात होते. सेती नदीनजीक दरीत हे विमान कोसळले होते. अपघातानंतर घटनास्थळाच्या परिसरात आगही लागली होती. त्यामुळे बचावकार्यासाठी पोहोचलेल्या पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

COMMENTS