छत्तीसगडमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्तीसगडमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

दंतेवाडा : छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील गोंदेरसच्या जंगलात सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा सुरक्ष

‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल
रायगडच्या इर्शालवाडीवर दरड कोसळली !
साताऱ्यातील शिवगर्जना मेळाव्यात खा. संजय राऊतांची मोदी शहांवर टीका 

दंतेवाडा : छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील गोंदेरसच्या जंगलात सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला.ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.चकमकीत मारल्या गेलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांची हिडमे कोहरामे व पोज्जे अशी नावे आहेत. पोलिसांनी हिडमे कोहरामे ही 5 लाखांचे तर पोज्जेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. गोंदेरसच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी या भागात शोधकार्य सुरू केले.या कारवाईत हिडमे कोहरामे व पोज्जे या दोघींचा खात्मा झाला. त्यांच्याकडून रायफलस व काडतुसे जप्त करण्यात आली. घटनास्थळी अद्याप शोध मोहीम सुरू आहे.

COMMENTS