Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किल्ले प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे अनावरण

सातारा / प्रतिनिधी : प्रतापगडाच्या रणसंग्रामात शौर्य गाजवणारे शुर शिलेदार जिवाजी महाले यांची 363 वर्षानंतर प्रथमच किल्ले प्रतापगड येथे प्रतिमेचा

जयवंतराव भोसले पतसंस्थेची 395 कोटींची व्यवसायपूर्ती : डॉ. अतुल भोसले
युवा नेते प्रतीक पाटील यांच्या लग्नाची जय्यत तयारी
मालखेड येथे कृष्णा नदीपात्रात मच्छिमारांना आढळला पोत्यात मृतदेह

सातारा / प्रतिनिधी : प्रतापगडाच्या रणसंग्रामात शौर्य गाजवणारे शुर शिलेदार जिवाजी महाले यांची 363 वर्षानंतर प्रथमच किल्ले प्रतापगड येथे प्रतिमेचा अनावर सोहळा झाल्यामुळे शूरवीर जिवाजी महाले यांना व महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजाला खर्‍या अर्थाने न्याय मिळाला.
शासनाने भव्य पुतळा उभारावा अन्यथा महाराष्ट्रातील तमाम सकल नाभिक समाज बांधव स्वतःच्या खर्चातून प्रतापगडावर पुतळा उभारतील. तसेच महाराष्ट्रातील सकल स्वाभिमानी नाभिक समाजाला कोणत्याही खाजगी जागेमध्ये पुतळा नको आहे. शासनाच्या आणि प्रतापगडावर पुतळा हवा आहे. अशी मागणी राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड किल्ले प्रतागडच्या प्रवेशद्वाराजवळ वीर जिवाजी महाले यांच्या भव्य प्रतिमा अनावरण प्रसंगी बोलताना केली.
शूरवीर जिवाजी महाले यांच्या यांच्या जयंतीचे अवचित साधून स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे सातारा ते प्रतापगड दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी जिल्ह्यातील अनेक गावातून नाभिक बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. ही दुचाकी रॅली सातारा जिल्हा परिषद मैदान येथून गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका वरच्या मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद , प्रतापसिंह महाराजयांच्या पुतळ्याला अभिवादन करुन राजवाडा, ते पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार हार घालून अभिवादन करून रॅली सातारा बस स्टँड मार्गे मेढा, कुडाळ, पाचवड, वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर मार्गाने जात असताना ठिकठिकाणी नाभिक समाज बांधवानी स्वागत केले. महाबळेश्‍वर येथे ओबीसी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. रॅली प्रतापगडाच्या प्रवेशद्वार जवळ पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमा उभारण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांच्या साक्षीने या प्रतिमेचे अनावरण राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS