Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणार्‍या तिघा मित्रांच्य

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले स्कॉर्पियो थेट संरक्षक पट्टीला जाऊ धडकली.
भीषण अपघात ! तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक.
दोन डबल डेकर बसमध्ये भीषण अपघात.

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणार्‍या तिघा मित्रांच्या अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात जालना रोडवरील सुंदरवाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. विजय जगन्नाथ काकडे, अभिषेक राजू लोकल असे मयत झालेल्या दोन मित्रांची नावे आहे. तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तिकर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS