Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नदीत उतरलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

चोपडा : नदीच्या काठालगत खेळत असताना पाण्यात उतरलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. सदरची घटना चोपडा तालुक्यातील दोंदवाडे गावालगत घडली. मृतांमध्

23 रोजी नांदेड येथे  सर्वधर्मीय सामुहिकविवाह मेळावा 
मोहोळजवळ अपघातात चार महिला भाविकांचा मृत्यू; सहा जण जखमी
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी

चोपडा : नदीच्या काठालगत खेळत असताना पाण्यात उतरलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. सदरची घटना चोपडा तालुक्यातील दोंदवाडे गावालगत घडली. मृतांमध्ये एक सहावर्षीय मुलगी व एक सातवर्षीय मुलाचा समावेश आहे.  चोपडा तालुक्यातील दोंदवाडे येथील मनीषा परशुराम कोटे (वय 6) व बाजीगर गाठीराम पावरा (वय 7) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दोन्ही बालकांचे वडील हे दोंदवाडे गावात सालदारकीचे काम करतात. गावाच्या लागतच तापी नदी असून ही दोन्ही मुले दुपारी नदीच्या काठाजवळच खेळत होती. अचानक खेळतांना ही मुले नदीत उतरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

COMMENTS