Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे प्रतिनिधी - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या मालवाहू ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य

चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.
मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका

पुणे प्रतिनिधी – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या मालवाहू ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. सतपाल झेटिंग कावळे (वय ४५ वर्ष) असं मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. कावळे हे कर्नाटकाहून माल ट्रकमध्ये भरून पुण्याच्या दिशेने चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना त्यांची ट्रक लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात आली. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामळे त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला.ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ट्रक चालक कावळे खाली उतरले. कावळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला व माझ्या तीव्र वेदना होत आहेत, असं फोनवरुन सांगितलं. नातेवाईकांनी जेवण करा व थोड्यावेळ आराम करा, असं सांगितले. त्यानुसार कावळे यांनी जेवण केले आणि काहीवेळ आराम करण्यासाठी झोपले. मात्र त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी लोणी काळभोर पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली. पोलीस तातडीने ॲम्बुलन्ससह घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी कावळे यांची तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं.

COMMENTS