Homeताज्या बातम्यासंपादकीय

तृणमूलचा काँगे्रसला धक्का

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवसांचा अवधी असून, त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापतांना दिसून येत आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 400 च्या

चीनचा पुन्हा कांगावा
भारत ‘भूक’बळी
नोकर भरतीला होणारा विलंब

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवसांचा अवधी असून, त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापतांना दिसून येत आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 400 च्या पार नारा देऊन विजयाचे संकेत दिले आहे. भाजपची प्रत्येक निवडणूक लढण्याची थीम वेगळी असते. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्वप्रथम त्यांचा विश्‍वास तोडण्याची गरज असते, आणि भाजप सध्या तेच करतांना दिसून येत आहे. भाजप विरोधकांचा सुपडासाफ करण्यासाठी प्रयत्न करत असला तरी, विरोधकांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत नाही. केंद्रीय सत्तेतून भाजपला दूर करण्याचा इंडिया आघाडीचा आणि विरोधकांचा मुख्य अजेंडाच नसल्याचे दिसून येत आहे. कारण प्रत्येकाला आपले राजकीय तख्त शाबूत ठेवण्यासाठीचा आटपिटा सुरू असल्याचे दिसून येत आहे. पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा असून, या जागांवर तृणमूल काँगे्रसने आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहे. खरंतर ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या अनेक बैठकांना हजेरी लावली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्व राज्यातील जागा लढल्या जातील असे वाटले होते. मात्र पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँगे्रसने सवता सुभा जाहीर करत, स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे पश्‍चिम बंगालमध्ये काँगे्रस विरूद्ध तृणमूल काँगे्रस आणि भाजप अशा तिरंगी लढती बघण्यास मिळणार आहे. विरोधक म्हणून तृणमूल काँगे्रस आणि काँगे्रसमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँगे्रस काही जागा काँगे्रसला सोडून आघाडी करून ही निवडणूक लढता आली असती. मात्र पश्‍चिम बंगालमध्ये आपले तख्त कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी या स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता काँगे्रस आणि आम आदमी पक्षामध्ये देखील आघाडी झाली असली तरी, पंजाबममध्ये मात्र आप स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे मायावती यांनी दुसर्‍यांदा आपण स्वबळावर लढण्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता इंडिया आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. विरोधकांचा सूर असाच होता की, केंद्रातील भाजप सरकार आम्हाला हटवायचे आहे, त्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, मात्र निवडणूक लढतांना भाजपच्या म्हणण्यानुसार आपले तख्त वाचवण्यासाठी, आपले अस्तित्व जिंवत ठेवण्यासाठीच या पक्षांचा आटपिटा चालल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा उद्देश स्पष्ट असला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असला तरी, आपल्या कोट्यातील जागा कमी करण्यास कोणताही पक्ष तयार नसल्याचे दिसून येत आहे. वंचित तर सोबत हवा आहे, मात्र त्यांना केवळ 2 जागांवर बोळवण करून त्यांना सोबत घेण्याचा महाविकास आघाडीतील पक्षांचा हेरा दिसून येतो. वास्तविक पाहता 2019 मध्ये वंचितमुहे आमच्या 10 जागा कमी झाल्याचा दावा करणारे आज त्यांना सामावून घेण्यासाठी आपण किती जागा सोडणार आहोत ते स्पष्ट करतांना कचरतांना दिसून येतात. त्यामुळे राजकीय पक्षांचा एकच अजेंडा दिसून येतो तो म्हणजे आपल्या राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकवणे आणि दुसरा म्हणजे आपले तख्त कायम राखण्यासाठी धडपड सुरू ठेवणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा दिसून येतो. त्यामुळे मोदीविरोध हा त्यांचा राजकीय कारकीर्दीचा एक भाग असल्याचे दिसून येत आहे. सर्व विरोधक एकत्र आले तर त्यांची ताकद निश्‍चितच वाढणार आहे, आणि जागा देखील वाढणार आहे. मात्र आमच्याच ताटात सर्वाधिक हवे, हा त्यांचा समज त्यांना घेऊन डूबणार असेच दिसून येत आहे. त्यामुळे उगाच या राजकीय पक्षांनी मोदीविरोधांचा आव आणू नये इतकेच.

COMMENTS