Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या शाहरुख त्याच्या मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे. पठाण च्या दमादार

अंबाजोगाईतील पवन लॉजच्या मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देवून रोख रक्कम लुटली
IPL 2023 चा 57 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे
पवार साहेबांच्या मदतीने मतदार संघाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटणार :आमदार आशुतोष काळे

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या शाहरुख त्याच्या मोस्ट अवेटेड ‘जवान’ चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे. पठाण च्या दमादार कमाईनंतर शाहरुख जवानच्या माध्यमातुन पुन्हा बॉक्स ऑफिसवर वादळ तयार करण्यासाठी तयार आहे. चित्रपटाशी संबधित प्रत्यक अपडेटवर चाहत्यांचे लक्ष आहेच.शाहरुखचे चाहते त्याच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. पण निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करताच चाहत्यांनी काउनडाउन सुरु केला होता. जवान चित्रपटाचा ट्रेलर 10 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता प्रदर्शित करण्यात आला . रेड चिलीज एंटरटेनमेंटने त्याच्या युट्यूब चॅनलवर हा ट्रलेर रिलज केला आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा प्रिव्ह्यू अॅक्शन पॅक आहे. प्रिव्ह्यूची सुरुवात शाहरुख खानच्या आवाजाने होते. ज्यामध्ये तो म्हणतो, ‘मी कोण आहे हे मला माहीत नाही, माझा कोणताही हेतू नाही. स्वतःला विचारा की मी पुण्य आहे की पाप आहे कारण मी देखील तू आहेस. तयार. नाव ऐकले असेल.” ट्रेलर तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला. तो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 15 सेकंदांचा आहे. जवान या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विजय सेतुपती, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर हे कलाकारही आपल्या अभिनय करणार आहे.

COMMENTS