Homeताज्या बातम्याक्रीडा

IPL 2023 चा 57 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे

मुंबई प्रतिनिधी- दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा ग

आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके
मॅच आधीच कर्णधार बाबर आझम बॅकफूटवर
भारताचा विश्वचषकात पराभव झाल्यामुळे तरुणाची आत्महत्या

मुंबई प्रतिनिधी- दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा गुजरातचा इरादा असेल. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा संघ गुजरातला हरवून प्लेऑफमधील आपला दावा मजबूत करू इच्छितो. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये निकराची लढत पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी १२ मे हा भाग्यवान दिवस ठरला आहे. हा दिवस मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज किरॉन पोलार्डचा वाढदिवस आहे. किरॉन पोलार्डच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्सचा संघ आजपर्यंत सामना हरलेला नाही.  वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि तुफानी फलंदाज कायरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून 13 हंगाम खेळले. तो 2010 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि आयपीएलमधून निवृत्ती होईपर्यंत या संघासोबत खेळत राहिला. आयपीएलमध्ये केवळ एकाच संघाकडून खेळणाऱ्या जगातील मोजक्या क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे. त्यांच्या कार्यकाळात मुंबईने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामापूर्वी त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर त्याला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले

COMMENTS