Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

पुणे : विदर्भ, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यातही गेल्या दोन दि

भारनियमनाविरोधात केडगावकर रस्ता रोकोच्या पवित्र्यात
रावसाहेब दानवेंच्या सभेत पत्रकबाजी… धनगर आरक्षणावरून युवकांनी विचारला जाब
भारतीय क्रिकेटची ब्राह्मणी परिक्रमा!

पुणे : विदर्भ, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे, त्यातच आता मुंबई-पुणे महामार्गावर बेलापूर ते नेरूळ दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
 रोडवरील खड्डे आणि सतत होत असलेल्या पावसामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता मुंबईहून पुण्याकडे येणार्‍या आणि मुंबईच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावरील बेलापूर ते नेरूळ दरम्यान सतत होत असलेल्या पावसामुळं अचानक दुपारपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. बेलापूर आणि नेरूळ मधील मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईतून पश्‍चिम महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मार्गावर फार वेळ वाट पाहूनही वाहनं पुढे सरकत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS