Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कल्याण डोंबिवली परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडी 

कल्याण प्रतिनिधी -  कल्याण डोंबिवली शहराच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र ही वाहतूक कोंडी का होते याबाबत कल्याण डोंबि

दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांनी नोंदणी करावी
ब्राझीलचा सत्ता संघर्ष ! 
आमदार डॉ. अनिल बोंडे ३ वाजल्यानंतर शुद्धीवर नसतात | LOK News 24

कल्याण प्रतिनिधी –  कल्याण डोंबिवली शहराच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र ही वाहतूक कोंडी का होते याबाबत कल्याण डोंबिवलीकरांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. शहरात विशेषतः भाडे सोडण्यासाठी व भरण्यासाठी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावत असल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतूक विभाग आणि आरटीओ यांचं कोणतंही नियंत्रण रिक्षांवर नसल्याचाआरोपही करण्यात आला आहे.  कल्याण डोंबिवली शहरं ही सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांची शहरं म्हणून ओळखली जातात. बहुतांश चाकरमानी हे प्रवासा साठी रिक्षांवर अवलंबून असतात. त्यातच परमिट प्रक्रिया सोपी झाल्याने रिक्षांची संख्या देखील वाढली आहे. शहरात वाहतूक कोंडी ही रिक्षांमुळे होत असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. अनेकदा रिक्षा ह्या वाटेल तशा उभ्या केलेल्या असतात. त्यातच भाडं दिसलं की कुठेही प्रवासी घेण्यासाठी रिक्षा उभ्या केल्या जातात. एक रिक्षा रस्त्यात थांबली की मागे वाहनांची रांग लागते. मोकळी जागा दिसली की कुठेही रिक्षा उभी केली जाते , अतिरिक्त रिक्षाही वाढल्या आहेत , रिक्षाचालकांची तपासणी केली जात नाही , कागदपत्रे बघितली जात नाही , आरटीओ आणि वाहतूक विभागाचे कोणतंही नियंत्रण रिक्षाचालकांवर नाही असा आरोपी एमएच 05 या प्रवासी संघटनेने केला आहे. तर रिक्षाचालक बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करतात ,  मर्जीप्रमाणे भाडं घेतात , वाहनांच्या सलग रांगेतून मध्येच प्रवासी भाडं घ्यायला रिक्षा थांबवतात. यामुळे अपघातांची शक्यता असते असे डोंबिवलीकरांनी सांगीतले आहे. मात्र लोकांसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींचाही वर्चस्व रिक्षा युनियनवर आहे. त्यामुळे आपल्याच नागरिकांना होणाऱ्या त्रासावर युनियन नेते  पुढाकार घेतील का ते पाहव लागेल. त्याचप्रमाणे आरटीओ आणि वाहतूक विभाग हे रिक्षा चालकांना शिस्त लावतात का? त्यावरही नागरिक लक्ष ठेवुन आहे. करण कायद्याची कोणतीही भीती नसल्याने हा मनमानी कारभार सुरू असल्याचं कल्याण डोंबिवलीकरांनी सांगितलं आहे.

COMMENTS