Homeताज्या बातम्यासंपादकीय

शाश्‍वत विकासाच्या दिशेने

जी-20 ची शिखर परिषद नुकतीच पार पडली असून, विशेष म्हणजे प्रथमच ही शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचे जाग

रशिया-युक्रेन युद्धाची वर्षपूर्ती
दिल्ली पोलिसांची दमनशाही
रशियाचे नरमाईचे सूर

जी-20 ची शिखर परिषद नुकतीच पार पडली असून, विशेष म्हणजे प्रथमच ही शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचे जागतिक पातळीवर महत्व अधोरेखित होतांना दिसून येत आहे. त्यासोबतच सर्व  जग शाश्‍वत विकासाच्या दिशेने पुढील मार्गक्रमणा करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. भारतासह जगासमोर सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वाचे आव्हान आहे. तापमानवाढीचे संकट गहिरे होतांना दिसून येत आहे, त्यावर मार्ग काढण्यासाठी भारताने पुढाकार घेतल्यमुळे भारताचे सर्वच क्षेत्रात कौतुक होतांना दिसून येत आहे. भारताने या परिषदेत हरित साठवण ही संकल्पना पुढे आणल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर  पर्यावरणाचा विचार करताना, कार्बनच्या साठ्यातील वाढीवर गेली अनेक दशके चर्चा होत आली आहे. कार्बन साठवण ही संकल्पना, आपण काय करायला नको यावर अधिक भर देते; तिचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे. त्यावर पर्याय म्हणून हरित साठवण या संकल्पेनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी, हा उपक्रम जागतिक पातळीवर सुरू करण्यासाठी भारताने जी-20 परिषदेत हा प्रस्ताव मांडला आहे. आणि भारताच्या या प्रस्तावाचे अमेरिकेसह अनेक देशांनी कौतुक केले आहे. खरंतर या परिषदेची थीमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे संपूर्ण जग एकच कुटुंब आहे,  या मूलभूत तत्वावर आधारलेली होती. ती थीम संपूर्ण जगाला भावली नसती तरच नवल. संपूर्ण जग एक कुटुंब असून, प्रत्येक देशाने गुण्या गोविंदाने राहिले पाहिजे, एकमेकांनी संकटाच्या काळात धावून गेले पाहिजे, त्यासोबतच परस्परातील विसंवाद समन्वयाने आणि चर्चेने सोडवले पाहिजे, हीच भारताची भूमिका संपूर्ण जगाने डोक्यावर घेतली. त्यामुळे ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पनेला या परिषदेत मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचे दिसून आले. यासोबतच संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून समजण्याचा आपला विचारच, प्रत्येक भरतीयाला, एक पृथ्वी या जबाबदारीच्या भावनेने जोडतो. आणि याच ‘एक पृथ्वी’ तत्वानुसार, भारताने ‘पर्यावरण अभियानासाठीची अनुरूप जीवनशैली असा उपक्रम सुरू केला. भारताच्या या उपक्रमामुळे आणि त्याला आपल्या सगळ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे संपूर्ण जगभरात, हे वर्ष, हवामान सुरक्षेच्या तत्वाला अनुसरून ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ साजरे केले जात आहे. याच विचारांचा धागा पकडून, भारताने, क्रॉप -26 मध्ये  हरित ग्रिड उपक्रम- एक सूर्य, एक जग, एक ग्रीड’ असा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे प्रतिबिंब या परिषदेत उमटले. आज भारत अशा देशांमध्ये उभा आहे जिथे मोठ्या प्रमाणावर सौर क्रांती होत आहे. लाखो भारतीय शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेती स्वीकारली आहे. मानवी आरोग्याबरोबरच माती आणि पृथ्वीच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ही एक मोठी मोहीम आहे. हरित हायड्रोजन उत्पादनाला चालना देण्यासाठी आम्ही भारतात ’नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ देखील सुरू केले आहे. भारताच्या  जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही जागतिक हायड्रोजन व्यवस्था तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सर्व देशांनी इंधन मिश्रणाच्या विषयाबाबत एकत्र येऊन काम करणे ही आज काळाची गरज आहे. पेट्रोलमध्ये 20%पर्यंत इथेनॉलचे मिश्रण करण्याची पद्धत सुरु करण्यासाठी जागतिक पातळीवर उपक्रम सुरु करण्यात यावा असा आमचा प्रस्ताव आहे. किंवा, त्याऐवजी, आणखी व्यापक जागतिक हितासाठी दुसरे एखादे इंधन मिश्रण विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, हे मिश्रण असे असावे जे हवामानाच्या संरक्षणासाठी योगदान देईल तसेच ते स्थैर्यपूर्ण उर्जा पुरवठ्याची सुनिश्‍चिती करू शकेल. यासंदर्भात, आज, आपण जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी करत, पुन्हा एकदा जगाला प्रभावित करत, शाश्‍वत विकासाचे महत्व अधोरेखित केले आहे.

COMMENTS