Homeताज्या बातम्यासंपादकीय

रशिया-युक्रेन युद्धाची वर्षपूर्ती

रशियाने युक्रेन या देशावर 24 फेबु्रवारी 2022 पासून हल्ले करण्यास सुरूवात केली होती. दोन दिवसानंतर या घटनेला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र या एका वर्ष

ट्रक चालक आणि कायदा
अवकाळी आणि तापमानवाढ
परदेशी विद्यापीठांसाठी भारतीय बाजारपेठ खुली

रशियाने युक्रेन या देशावर 24 फेबु्रवारी 2022 पासून हल्ले करण्यास सुरूवात केली होती. दोन दिवसानंतर या घटनेला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र या एका वर्षात रशियाला युक्रेनचा काही ताबा मिळवता आलेला नाही रशियाचे हजारो लोकांचा मृत्यू झाला, अनेक शहरे उद्धवस्त झाले, कोटयावधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले, तरीही युक्रेन मात्र एखाद्या योद्धासारखा लढत राहिला. रशियाने हल्ले केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतर युक्रेन शरण येईल, असे मानले जात होते. मात्र हार मानेल तो युक्रेन कसला. त्याने आपल्या पद्धतीने युद्ध सुरूच ठेवले. आणि रशियाला जिंकू दिले नाही. दोन दिवसानंतर या युद्धाला एक वर्षपूर्ण होईल, मात्र युक्रेन अजुनही लढतो आहे. विशेष युद्धाचे ढग अजूनही गेलेले नसतांना, युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांची गळाभेट घेतली. वास्तविक पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इतर राष्ट्राध्यक्षांपेक्षा आक्रमक नाही. तसेच त्यांचा स्वभाव हा वादाच्या भूमिकेत जाण्याचा नाही. त्यामुळे त्यांनी युक्रेनच्या युद्धभूमीला दिलेली भेट ही अनपेक्षित आहे. मात्र या भेटीमुळे युक्रेनला अमेरिका आपल्या पाठीशी असल्याची खात्री पटली असून, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. मुळातच या युद्धाची कारणे नाटो संघटना कारणीभूत असल्याचे लपून राहिलेले नाही. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ज्याची सुरुवात 1949 साली झाली. युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे आहे, परंतु रशिया याच्या विरुद्ध आहे.

पण नाटोमध्ये सामिल होण्याला रशियाचा विरोध आहे. एकेकाळी सोव्हिएत युनियनच्या काळात मित्र असलेले हे प्रांत दोन देश झाल्यानंतर एकमेकांचे कट्टर शत्रू का झाले आहेत? याचे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे नाटो संघटनेत युक्रेनचा समावेश करण्यासाठी अमेरिकेने केलेली कसरत. अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या संस्थेमध्ये 30 देशांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक युरोपमधील आहेत. मात्र, यातील बहुतांश सैनिक हे अमेरिकेतील आहेत. रशियावर दबाव आणण्यासाठी आणि जुन्या मतभेदांमुळे अमेरिका अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने करत आला आहे. अमेरिकेने यापूर्वीही रशियावर निर्बंध लादून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांची ही युक्ती आजवर कामी आली नव्हती. आता अमेरिकेला हे काम युक्रेनच्या मदतीने करायचे आहे. युक्रेन नाटो सोबत गेल्यास त्याचे सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर अमेरिका रशियाचे नुकसान करण्यात अंशतः यशस्वी होऊ शकते, अशी रशियाला चिंता आहे. त्यामुळे रशियाने युके्रनवर हल्ले केले. तब्बल वर्षभर युक्रेनवर हल्ले झाले. हजारो लोकांचा मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात मदत कोणत्याच देशाने केलेली नाही.  गेल्या 12 महिन्याच्या युद्धकाळात युक्रेनने रशियाने व्यापलेल्या आपल्या प्रदेशांचा काही भाग परत मिळवण्यात आणि अर्थव्यवस्था कोसळण्यापासून रोखण्यात यश मिळविले आहे. त्यासोबतच रशिया आता बॅकफूटवर जातांना दिसून येत अहे. एकतर रशियाने इतर देशांशी उघड शत्रुत्व घेतलेले आहे. त्याचसोबत रशियाला युरोपमधील कोणताही देश लवकरात लवकर सहकार्य करण्याची शक्यता तशी नाहीच. त्यामुळे रशिया एकाकी पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकत जाऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता बायडन यांनी युके्रनमध्ये पाऊल ठेवल्याने युक्रेनला बळ मिळाले आहे.  युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी आणि पाश्‍चात्य भागीदारांची युती तयार करण्यात अमेरिकेची नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच वेळी, रशियन फेडरेशनशी संघर्षात सामील होण्याच्या भीतीमुळे पश्‍चिम युक्रेनच्या लष्करी क्षमतेवर लक्ष ठेवत आहे. युक्रेन सैन्याने असे म्हटले आहे की रशियाने ताब्यात घेतलेला प्रदेश परत घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, परंतु त्यासाठी त्यांना अधिक शस्त्रे आवश्यक आहेत. बायडेन यांच्या भेटीमुळे युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रात्रे आणि मोठी आर्थिक रसद मिळू शकते. त्यामुळे युक्रेन पुन्हा एकदा स्थिरस्थावर होऊ शकतो. 

COMMENTS