Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदी उद्या करणार जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे उद्घाटन

नवी दिल्ली : आगामी पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेबाबत केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन मंत्री जी के रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संब

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा
वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला जाणार
पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा

नवी दिल्ली : आगामी पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेबाबत केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन मंत्री जी के रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे  दघाटन करणार असल्याची माहिती जी के रेड्डी यांनी दिली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनच्या सहकार्याने 20-21 एप्रिल रोजी नवी दिल्लीत अशोक हॉटेल येथे हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार विविध उपक्रम, स्मरणोत्सव आयोजित करत आहे आणि पहिली आंतरराष्ट्रीय बौद्ध शिखर परिषद भारतात आयोजित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


विविध देशातील प्रमुख बौद्ध भिक्खू पहिल्यांदाच भारताला भेट देणार असून परिषदेत सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. बौद्ध तत्वज्ञान आणि विचारांचा आधार घेऊन  समकालीन आव्हानांवर मात कशी करावी, यासंदर्भात या परिषदेत विचारमंथन होईल, असे ते म्हणाले. बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला असून या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेमुळे त्यादृष्टीने बौद्ध धर्मामधील भारताचे  महत्व अधोरेखित होईल, असे त्यांनी सांगितले. या दोन दिवसीय जागतिक बौद्ध परिषदेची संकल्पना  समकालीन आव्हानांना प्रतिसाद : तत्वज्ञान ते रूढ प्रघात अशी आहे. विविध देशातील प्रमुख बौद्ध भिक्खू पहिल्यांदाच भारताला भेट देणार असून परिषदेत सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. बौद्ध तत्वज्ञान आणि विचारांचा आधार घेऊन  समकालीन आव्हानांवर मात कशी करावी, यासंदर्भात या परिषदेत विचारमंथन होईल, असे ते म्हणाले. बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला असून या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेमुळे त्यादृष्टीने बौद्ध धर्मामधील  भारताचे  महत्व अधोरेखित होईल, असे त्यांनी सांगितले. या दोन दिवसीय जागतिक बौद्ध परिषदेची संकल्पना समकालीन आव्हानांना प्रतिसाद : तत्वज्ञान ते रूढ प्रघात अशी आहे. ही जागतिक शिखर परिषद, इतर देशांशी सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध वृद्धिंगत करण्याचे एक माध्यम ठरेल, असे जी किशन रेड्डी यांनी सांगितले. या परिषदेत सुमारे 30 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून परदेशातील सुमारे 171 प्रतिनिधी आणि भारतीय बौद्ध संघटनेचे 150 प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS