Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशाला महात्मा गांधी,विनोबा भावे व निर्मला देशपांडे यांचे कार्य व विचार मार्गदर्शक आहेत-डॉ. कैलास दौंड

पाथर्डी प्रतिनिधी - देशाला आजही महात्मा गांधी,विनोबा भावे व निर्मला देशपांडे यांचे कार्य व विचार मार्गदर्शक असल्याचे  प्रतिपादन राजीव फाउंडेशन

युवकांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मोफत केली पीक नोंदणी
गोधेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके
डॉ. संजय दवंगे यांची मुक्त विद्यापीठाच्या हिंदी साहित्य लेखनासाठी नियुक्ती

पाथर्डी प्रतिनिधी – देशाला आजही महात्मा गांधी,विनोबा भावे व निर्मला देशपांडे यांचे कार्य व विचार मार्गदर्शक असल्याचे  प्रतिपादन राजीव फाउंडेशन व अखिल भारतीय रचनात्मक समाज महाराष्ट्र यांच्या वतीने पद्मविभूषण स्व.निर्मला देशपांडे यांच्या ९४ जयंतीनिमित्त कोळसांगवी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. कैलास दौंड यांनी केले. यावेळी पांडुरग आंधळे,नासीर शेख,अमोल फुंदे, बशीर शेख,वामन गाडे,दगडू धनवडे,गणेश धनवडे, रणजीत गाडे,जि.प शाळेचे शिक्षक,ग्रामसेविका सांगळे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या 50 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व मिठाई वाटप करण्यात आले.

        पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,राष्ट्रपिता महात्मा गांधी,विनोबा भावे व निर्मला देशपांडे यांच्या कार्याबद्दल देताना म्हटले की,निर्मला देशपांडे यांचे भूदान चळवळीतील योगदान खूप मोठे व महत्त्वाचे आहे.,भूदान चळवळीसाठी त्यांनी देशभरात विनोबा भावे यांच्या बरोबर जवळपास ४० हजार किलोमीटर ची पदयात्रा केली.देशातील शांती, सद्भावना  व गांधी विचार प्रसासणासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दोन वेळा त्यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य बनविण्यात आले व ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर त्यांना देशात व देशाबाहेर देखील शांती व सद्भावनेसाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज फुंदे यांनी अरविंद सोनटक्के यांनी प्रास्ताविक तर छबूलाल शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS