Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिनाभरात तीन बस आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबई/प्रतिनिधी ः रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे बुधवारी सीएनजी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर ‘बेस्ट’ने हे पाऊल उचलले. मे. मातेश्‍वर

बजरंग दल व दुर्गावाहिनीकडून गणरायाचे निर्विघ्न विसर्जन
संजय राऊत यांना थोडी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या – नितेश राणे 
दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे बुधवारी सीएनजी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर ‘बेस्ट’ने हे पाऊल उचलले. मे. मातेश्‍वरी कंपनीद्वारे चालविण्यात येणार्‍या टाटा कंपनीच्या ‘सीएनजी’वर चालणार्‍या दोन बसगाडयांना आग लागण्याच्या घटना आधीच घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती झाली.
बेस्ट बस क्रमांक 415 अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे आली तेव्हा ती प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. शेवटचा थांबा असल्याने सर्व प्रवासी उतरल्यानंतर 6.55 च्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. 20 ते 25 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत बस आगीत खाक झाली. आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. बसमध्ये आवश्यक बदल आणि योग्य उपाययोजना करेपर्यंत 400 बसगाडया बंद ठेवण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने घेतला. त्यामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांनी 400 बस बंद असल्याचे लक्षात घ्यावे, असे आवाहन ‘बेस्ट’ने केले. ‘सीएनजी’वरील बसला आग लागण्याच्या घटना 25 जानेवारी आणि 11 फेब्रुवारी रोजी घडल्या होत्या. बुधवारी बसला आग लागण्याची तिसरी घटना घडली.

COMMENTS